Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “चोर पोलीसचा” खेळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 12:01 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या रहिवाश्यांनी घरामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उल्हासात साजरा केला. ज्यामध्ये मेघा धाडेची लावणी, रेशम ...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या रहिवाश्यांनी घरामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उल्हासात साजरा केला. ज्यामध्ये मेघा धाडेची लावणी, रेशम आणि स्मिताचा धम्माकेदार डांस, आस्ताद काळे तसेच प्रेसेनजीत कोसंबीचे गाणे प्रेक्षकांना बघायला मिळाले.आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे चोर पोलिसचा खेळ. या खेळामध्ये कोण विजयी ठरेल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? कोण नॉमिनेट होईल घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये ? हे बघणे रंजक असणार आहे.लहानपणी आपण सगळ्यांनीच वेगवेगळे खेळ खेळले असतील आणि त्यातलाच एक म्हणजे चोर पोलीस.लहानपणीचा हा उत्कंठावर्धक खेळ गंमत म्हणून खेळला गेला असला तरी आता या घरामध्ये मात्र कॅप्टनसी,लक्झरी बजेट आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या खेळामधील स्पर्धकांचे पुढील अस्तित्व ठरवणार आहे.यामुळे सगळ्यांची चोर पोलीस खेळण्याची तयारी सुरु झाली. गोष्टी लपवणे, गोष्टी अश्या ठिकाणी लपवणे जिथून त्या कोणाला मिळणार नाहीत.खेळ खेळताना कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कुठल्या गोष्टी करू नये, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी या बाबतचे निर्णय घेण्यात येणार आहेत.कुठला संघ आता या खेळामध्ये बाजी मारणार ? कोण होणार नॉमिनेट हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉसच्या रहिवाश्यांची आजच्या दिवसाची सुरुवात “सावधान सावधान वणवा पेट घेत आहे” या गाण्यावर झाली. बिग बॉसने दिलेल्या “खुर्ची सम्राट या खेळावरून घरामध्ये बरीच भांडण झाली.रहिवाश्यांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले.टीम रेशम विरुध्द टीम आस्ताद असे जरी खेळाचे दोन गट असले तरीदेखील टीम रेशम मधील स्पर्धकांनी आस्तादला वगळता बाकी सगळ्यांवर आपली नाराजगी, राग व्यक्त केला.यावेळी सगळ्यांचीच वेगळी रूपं प्रेक्षकांच्यासमोर आली असे म्हणायला हरकत नाही. घरातील सदस्यांची हि नाराजगी बघता आऊ म्हणजेच उषाजीं सगळ्यांची माफी मागितली.सई लोकुरला टीम रेशमची तिच्याप्रती असलेली वागणूक अजिबात आवडली नाही. या खेळानंतर घरामध्ये खरोखरच दोन ग्रुप पडलेले जाणवत आहेत, ते म्हणजे आस्ताद, रेशम, राजेश, भूषण, विनीत आणि सुशांत तर दुसरीकडे मेघा, उषाजी, पुष्कर, सई आणि ऋतुजा. आता विनीत आणि अनिल थत्ते नक्की कोणत्या गटात आहेत किंवा त्यांना कोणता गट आपलसं करेल हे येणारी वेळचं सांगेल.