Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या'नं केली इतकी मोठी चूक, अखेर शिल्पा तुळसकरला शेअर करावं लागलं इंस्टाग्रामवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:30 IST

तुला पाहते रे मालिकेतील कलाकारांनी नुकतेच चला हवा येऊ द्यामध्ये हजेरी लावली होती. हा भाग नुकताच प्रसारीत करण्यात आला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुला पाहते रे सध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत राजनंदिनीचा पुनर्जन्म म्हणजे ईशा असे सध्या दाखवण्यात येत आहे. त्यामुळे या मालिकेत राजनंदिनीच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर व ईशाच्या भूमिकेत गायत्री दातार पहायला मिळत आहेत. तुला पाहते रे मालिकेतील कलाकारांनी नुकतेच झी मराठीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्यामध्ये हजेरी लावली होती. हा भाग नुकताच प्रसारीत करण्यात आला आहे. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमकडून एक चुक झाली आहे आणि ही चुक अभिनेत्री शिल्पा तुळसकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. नेमकी काय चुक असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना.

चला हवा येऊ देच्या सेटवर तुला पाहते रे मालिकेच्या प्रमुख कलाकारांनी हजेरी लावली होती. यात सुबोध भावे, गायत्री दातार, शिल्पा तुळसकर, विद्या करंजीकर, आशुतोष गोखले,अभिज्ञा भावे, पूर्णिमा यांनी हजेरी लावली होती.

या कलाकारांनी हजेरी लावलेला भाग नुकताच प्रसारीत करण्यात आला. त्यात शिल्पा तुळसकरसमोर ईशा दातारचे नाव लिहिले आहे. ही चला हवा येऊ द्याच्या टीमकडून झालेली चूक शिल्पा तुळसकरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने ही चूक मजेशीर पद्धतीने शेअर करत म्हटले की, फायनली!!! ईशा म्हणजे राजनंदिनी नाही!!! शिल्पाच गायत्री आहे!!! मी आश्चर्यचकीत झाले की त्यांनी मला सुबोध भावे किंवा गजा पाटील म्हटले नाही.

सध्या तुला पाहते रे मालिका रंजक वळणावर आली असून ईशाने सरंजामे घरातील सर्व सदस्यांना ती राजनंदिनी असल्याचे पटवून दिले आहे आणि हळूहळू तिने सरंजामे कंपनीचा ताबादेखील आपल्याकडे घेतला आहे.

त्यामुळे कॉन्फरंससाठी लंडनला गेलेला विक्रांत परतल्यानंतर ईशा काय कृती करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :तुला पाहते रेचला हवा येऊ द्या