त्याचे झाले असे की, कॅप्टनशिपसाठी मनवीर गुर्जर आणि रोहन मेहरा यांच्यात खेळण्यात आलेल्या टास्कमध्ये स्वामी ओम यांनी नेहमीप्रमाणे रोहनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मनवीर आणि रोहनला घरातील गार्डन एरियामध्ये ठेवण्यात आलेल्या एका फडफील्डवर फ्लावर्स लावायचे होते. त्यासाठी मनवीरला गुलाबी आणि रोहनला पर्पल रंगाचे फ्लावर्स दिले गेले. दोघांनाही आपापले फ्लावर्स फडफील्डवर लावल्यानंतर एकमेकांचे फ्लावर्स एका ठरावीक वेळेत काढायचे होते. या टास्कची संचालिका असलेली बानी रोहन आणि मनवीरला टास्कविषयी सूचना देत असतानाच स्वामी ओम याने रोहनचे फडफील्डवर लावलेले सर्व फ्लावर्स उपटण्यास सुरुवात केली. हे बघून गौरवने स्वामी ओमला घट्ट पकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गौरव आणि स्वामी ओम यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. दोघांनीही एकमेकांचे उणेदुणे काढत धक्काबुक्की केली.#OmSwami strikes once again! He intervenes during the Captaincy Task between @rohan4747 & #ManveerGurjar on #BB10! #Videopic.twitter.com/qDYdle0dlf— COLORS (@ColorsTV) December 29, 2016
बिग बॉस : रोहनने दिली ‘बिग बॉस’ला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 14:00 IST
बिग बॉसचा दहावा सीजन प्रेक्षकांपेक्षा दस्तूरखुद्द बिग बॉसच्याच अधिक स्मरणात राहील असेच चित्र सध्या दिसत आहे. कारण घरातील सदस्य ...
बिग बॉस : रोहनने दिली ‘बिग बॉस’ला धमकी
बिग बॉसचा दहावा सीजन प्रेक्षकांपेक्षा दस्तूरखुद्द बिग बॉसच्याच अधिक स्मरणात राहील असेच चित्र सध्या दिसत आहे. कारण घरातील सदस्य आपापसात जेवढे वाद करीत आहेत, तेवढीच हुज्जत ते बिग बॉसबरोबरही घालत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते या सीजनमध्ये बिग बॉसला आपल्या विशिष्ट आवाजापलीकडे जाऊन घरातील सदस्यांना दम भरावा लागत आहे. प्रेक्षकांसाठी हे सर्व आश्चर्यकारक वाटत असले तरी, घरातील सदस्य मात्र बिस बॉसला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. सुरुवातीला प्रियंका जग्गा, त्यानंतर स्वयंघोषित बाबा स्वामी ओम आणि आता रोहन मेहरा याने बिग बॉसशी हुज्जत घालत घराबाहेर पडण्याचा दम भरल्याने बिग बॉसची चांगलीच फसगत झाल्याचे दिसून आले.}}}} ">http:// दुसरीकडे मनवीर आणि रोहन यांच्यात मुकाबला सुरू झाला होता. टास्क संपल्यानंतर बानी फडफिल्डवर असलेले रोपटे मोजत होती. रोहनचे ५४, तर मनवीरचे ६६ रोपटे फडफिल्डवर असल्याने या टास्कमध्ये मनवीरला विजयी घोषित करण्यात आले. त्याचबरोबर घराच्या कॅप्टनची माळही त्याच्या गळ्यात पडली. कॅप्टनशीपच्या महत्त्वाच्या सामन्यात स्वामी ओममुळे पराभव झाल्याने संतापलेल्या रोहनने त्यांना जोरदार धक्का देत त्यांच्याशी हुज्जत घातली. स्वामी ओमनेदेखील रोहनला शिवीगाळ करीत त्याच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला. मनू आणि गौरवने मध्यस्थी करीत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वामी ओमने यासर्व प्रकारचे भांडवल करण्यास सुरुवात केली. कॅमेºयासमोर येत मला एका कानाने ऐकू येत नसल्याचे बिग बॉसला सांगितले. तसेच रोहनवर कारवाई म्हणून त्याला घराबाहेर काढले जावे यासाठी त्यांनी बिग बॉसकडे तगादा लावला. अखेर रात्री उशिरा बिग बॉसने सर्व सदस्यांना अॅक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावून रोहनची कानउघडणी केली. घरात हिंसा करणे अमान्य असतानाही रोहनने स्वामी ओमवर हात उगारला. रोहनचा हा व्यवहार निंदाजनक असून, तो शिक्षेस पात्र असल्याचे बिग बॉसने सांगितले. तसेच पुढच्या काळात तो थेट नॉमिनेट असेल अशी शिक्षाही बिग बॉसने त्याला सुनावली. मात्र बिग बॉसचा हा निर्णय रोहनच्या अजिबात पचनी पडला नाही. त्याने स्वत:ला बाथरूममध्ये बंद करून घेत मला हा गेम खेळायचा नसल्याचे सांगितले. तसेच माइक काढून ठेवत जोपर्यंत मला माझ्या वडिलांशी व वकिलांशी बोलणे करून दिले जात नाही, तोपर्यंत मी बाथरूमच्या बाहेर येणार नाही, अशी धमकीच बिग बॉसला दिली. गौरव आणि लोपामुद्राने त्याची समजूत काढण्यचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तो बाथरूमबाहेर येण्यास तयार नसल्याने बिग बॉसने गौरव आणि लोपाला कन्फेशन रूममध्ये बोलावले. तसेच रोहनची समजूत काढण्यास सांगितले. तरीदेखील रोहन बाथरूमबाहेर येत नव्हता. अखेर बिग बॉसने त्याला कन्फेशन रूममध्ये बोलावले. तू हिंसा केली, त्यामुळेच तुला शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तू माइक काढून ठेवून घरातील एका महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन करीत आहेस, अशा शब्दात सुनावले. मात्र रोहनने बिग बॉसची कुठलीही गोष्ट ऐकून न घेता मला माझ्या वडिलांशी व वकिलांशी जोपर्यंत बोलणे करून दिले जाणार नाही, तोपर्यंत मी माइक घालणार नसल्याचे सांगत कन्फेशन रूममध्येच माइक काढून ठेवत पुन्हा बाथरूममध्ये स्वत:ला बंद करून ठेवले. रोहनचे हे नाट्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अखेर संतापलेल्या बिग बॉसने रोहनला पुन्हा खडेबोल सुनावत, रोहन जर बाथरूमबाहेर आला नाही, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा बिग बॉसला विचार करावा लागेल. तसेच त्याचे कोणाशीही बोलणे करून दिले जाणार नाही. कॉन्ट्रॅक्टनुसार त्याला घराबाहेर पडता येणार नाही. जर तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला तर याचा परिणाम त्याच्या करिअरवरही होवू शकतो. अशी धमकीच बिग बॉसने रोहनला दिली. आता बिग बॉसच्या या धमकीनंतर रोहन काय पवित्रा घेणार हे बघणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.