Join us
Daily Top 2Weekly Top 5

हातात हात घालून मध्यरात्री बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट कॅमेऱ्यात कैद, शमिता शेट्टी -राकेश बापटची रोमँटीक डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:07 IST

'बिग बॉस OTT'शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टीची चांगलीच जवळीक वाढली होती. घरात दोघेही सतत एकत्र असायचे. राकेश आणि शमिता या सीजनची सर्वात लोकप्रिय जोडी ठरली.

सोशल मीडियावर सध्या राकेश बापट आणि शमिता शेट्टी चर्चेचा विषय बनले आहेत. 'बिग बॉस OTT'शोमध्ये सहभागी झाल्यापासून दोघेही प्रचंड चर्चेत आले आहेत. आता तर दोघांमध्ये वेगळेच नाते पाहायला मिळत आहे. आता त्यांच्या रोमँटीक केमिस्ट्रीमुळे त्यांच्यावर चर्चा होत आहे.'बिग बॉस OTT'चा पहिला सिझनही चांगलाच गाजला होता. घरात राकेश बापट आणि शमिता शेट्टीची चांगलीच जवळीक वाढली होती. घरात दोघेही सतत एकत्र असायचे.

 

राकेश आणि शमिता या सीजनची सर्वात लोकप्रिय जोडी ठरली. दोघेही एकमेकांना पसंत करत असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून द्यायचे. दोघेही एकमेकांना आधार देताना दिसायचे. दोघांच्या वाढत्या जवळीकमुळेच दोघांच्या अफेअरच्याही चांगल्याच चर्चा रंगत आहेत. घरात असतानाच राकेश बापट शमिताच्या संपर्कात असणार, घरात झालेली मैत्री बाहेर पडल्यानंतरही अशीच घट्ट राहणार असे सांगितले होते. अगदी त्याचप्रमाणे  शो संपल्यानंतरही दोघेही संपर्कात आहेत.

नुकतेच मीडियाच्या कॅमेऱ्यात दोघेही एकत्र कैद झाले आहेत. हातात हात घालून दोघेही रोमँटीक डेटसाठी गेले होते. या दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिलेला होता. सध्या सोशल मीडियावर हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. या खास या डिनर डेटसाठी दोघांचीही स्टाईल लक्षवेधी होती. लव्हबर्ड्स  खूपच डॅशिंग वाटत होते.

चाहत्यांना या दोघांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकताही निर्माण झाली आहे. घरात या  दोघांनी प्रत्यक्षपणे नात्याची कबुली दिली नसली तरी सध्या हे दोघे बिनधास्त सोबत वेळ घालवताना दिसून येत आहेत.यावरुनच दोघांमध्ये मैत्रींपेक्षाही प्रेमाचे नाते बहरत असल्याच्या चर्चा आहेत. 

राकेश बापटच्या खासगी आयुष्यावर बोलायचे झाले तर त्याचे लग्न टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोंगरासोबत झाले होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २०११मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्रीही होती.

 

पण लग्नाच्या ८ वर्षातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली दोघांनी घटस्पोट घेत वेगळे झाले होते.त्याच्या या घटस्फोटाविषयी राकेस शमितासोबत बोलताना दिसला होता. त्यावेळी त्याचे दुःख ऐकून शमितानेही त्याला मिठी मारली होती.

टॅग्स :राकेश बापट