Join us

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ मध्ये समृद्धी जाधव जिंकतीये सर्वांची मने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 16:30 IST

समृद्धी जाधव ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन झाली होती.

समृद्धी जाधव ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून तिचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. समृद्धी एका सामान्य घरातून आलेली बिग बॉस मराठी ४ ची स्पर्धक आहे. ती दिसायला जरी मॉडर्न असली तरी तिचे राहणीमान अतिशय साधे असल्याचे दिसून येते. बिग बॉस मराठी सिझन ४ च्या घरात ती सर्वात तरुण स्पर्धक असून तिने तिच्या खेळाने सर्वांना भुरळ पाडली आहे. ह्या आधी ती स्प्लिट्सव्हिल्ला १३ मध्येसुद्धा दिसून आली होती.

समृद्धी जाधव ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन झाली होती. बिग बॉस मराठी सीझन  ४ च्या खेळाला आता ५० हून अधिक दिवस झाले आहेत. या ५० दिवसात एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा समृद्धीने कॅप्टनपदाची बाजी मारली आहे..

बालपणापासूनच समृद्धी शिक्षणासोबत इतर उपक्रमांमध्येही सहभाग घेत होती. समृद्धी इंटरनॅशनल स्केटिंग चॅम्पियन असून वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून ती वेगवेगळ्या स्पर्धा जिंकत आली आहे. दूरदर्शनचा सुप्रसिद्ध कार्यक्रम दम दमा दम या कार्यक्रमात ती २००५ साली उपविजेती ठरली होती. समृद्धी अतिशय सभ्यतेने आणि खरेपणाने तिचा खेळ खेळत आहे. समृद्धी ॲथलिट असल्याचा तिला बिग बॉसच्या घरात फायदा होत आहे. प्रत्येक टास्क खेळताना ती अतिशय जिद्दीने खेळत असून हुशारीने निर्णय घेऊन पुढे वाटचाल करत आहे.

बिग बॉस च्या घरात ती सर्वांना मदत करायला अतिशय तत्पर असते. शिवीगाळ, असभ्य वर्तणूक आशा कोणत्याही गोष्टीचा  आधार न घेता ती तिचा खेळ उत्तमरित्या खेळत आहे. अभिनेत्री यशश्री मसुरकर नुकतीच बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाली आहे आणि नुकत्याच झालेल्या लाईव्ह सेशनमध्ये तिला तिची बिग बॉसच्या घरातील फेव्हरेट व्यक्ती कोण आणि कोणाला मत द्यायला आवडेल असे विचारले. त्यावेळी तिनेदेखील समृद्धी माझी फेव्हरेट आहे असे म्हणत समृद्धीला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तिचे घरातील वागणे पाहता ती नक्कीच टॉप ५ गाठेल यात शंका नाही. समृद्धीचा खेळ बघत राहा आणि तिला भरभरून वोटिंग करून १०० दिवस पार करायला मदत करा!

समृद्धीला वोट करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

टॅग्स :बिग बॉस