Join us

बिग बॉस : मनवीरच्या वडिलांनी दिला मनूपासून दूर राहण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 18:41 IST

बिग बॉसच्या घरात सध्या आनंदी आनंद आहे. आपल्या परिवारातील लोकांना भेटून घरातील सदस्य हरकून गेले आहेत. मात्र त्याचबरोबर आपल्या ...

बिग बॉसच्या घरात सध्या आनंदी आनंद आहे. आपल्या परिवारातील लोकांना भेटून घरातील सदस्य हरकून गेले आहेत. मात्र त्याचबरोबर आपल्या स्वकियांनी दिलेल्या टीप्सही ऐकून घेतल्याने आनंदी वातावरण केव्हा वादळी होईल हे सांगणे मुश्किल आहे. एव्हाना ही वादळापूर्वीची तर शांतता तर नाही ना? असा तर्क सध्या वर्तविला जात आहे. कारण घरात आलेल्या मनवीर गुर्जरच्या वडिलांनी त्याला त्याचा सर्वांत जवळचा जीवलग मित्र मनूपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याने मनवीर सध्या विचारात पडला आहे. मनवीरचे वडील घरात आल्याने मनवीर खूपच भावुक झाला होता. त्यांच्या पाया पडत त्याने त्यांचे आशीर्वाद घेतले. भावुक झालेल्या मनवीर आणि त्याच्या वडिलांना घरातील सदस्यांनी एकांतात जाण्याचे सांगितले. दोघेही अ‍ॅक्टिव्हिटी एरियामध्ये ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसले. दहा मिनिटांच्या या भेटीत मनवीरच्या वडिलांनी त्याला काही टीप्स दिल्या. जेव्हा त्यांनी मनूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला तेव्हा मनवीर विचारात पडला. त्याचे वडील म्हणाले की, मनू घरात परतल्यापासून बदलला आहे. त्याच्यापासून सावध रहा. वडिलांनी दिलेल्या या टीप्सवर मनवीरने विचार करीत म्हटले की, जे काही करणार ते स्वत:च्या विचाराने करणार. }}}} ">http://वडील घराबाहेर पडताच मनू बाथरूममध्ये जाऊन रडत होता. मोनाने त्याला बाहेर येण्यासाठी आवाज दिला असता तो बाहेर येत नव्हता. अखेर मनवीरने त्याला बाहेर येण्यास सांगितले. मनवीर त्याची समजूत काढत असतानाच तो त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला. तुझ्या वडिलांना बघून मला माझ्या आईची आठवण आल्याचे तो वारंवार सांगत होता. मनूचे रडणे बघून मनवीरने वडिलांनी दिलेला सल्ला काहीकाळ विसरून त्याचे सांत्वन केले. त्यामुळे येत्या काळात मनवीर वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गेम खेळणार की पुन्हा मनूच्याच इशाºयावर खेळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. नीतिभालाही दिला सल्लानीतिभाची आई जेव्हा तिला भेटण्यासाठी घरात येते तेव्हा नीतिभा खूश होवून तिला मिठी मारते. मी कशी खेळत आहे, टीव्हीवर कशी दिसत आहे, घरचे कसे आहेत, माझे मित्र मला सपोर्ट करीत आहेत की नाही असे अनेक प्रश्न ती आईला विचारते. त्यावर तिची आई तिला लोपामुद्रासारखा स्टॅण्ड घेत जा आणि प्रियंका जग्गापासून दूर रहा, असा सल्ला देते. तसेच मेकअप थोडा कमी करत जा, कारण टीव्हीवर तो अधिक भडक दिसत असल्याचेही ती म्हणते. आई भेटल्याने नीतिभा चांगलीच खूश झाली.