बिग बॉसमध्ये सेलिब्रटीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:19 IST
बिग बॉस या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन हा आतापर्यंतच्या सगळ्या सिझनपेक्षा वेगळा असणार आहे. बिग बॉसमध्ये नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी ...
बिग बॉसमध्ये सेलिब्रटीच नाही
बिग बॉस या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन हा आतापर्यंतच्या सगळ्या सिझनपेक्षा वेगळा असणार आहे. बिग बॉसमध्ये नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थिती लावतात. त्यामुळे बिग बॉस या कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन घोषित झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रेटी जाणार याची चर्चा रंगलेली असते. पण यंदाच्या सिझनमध्ये सेलिब्रेटींसोबत सामान्य लोकही असणार आहेत. सेलिब्रेटींना एकमेकांचे राहाणीमान, सवयी माहिती असल्याने त्यांना एकमेकांसोबत राहाणे सोपे जाते. पण आता त्यांना सामान्य लोकांसोबत एकाच घरात राहावे लागणार आहे. यंदा सामान्य लोकांसोबत कोण कोण सेलिब्रेटी असणार याची सध्या सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. पण बिग बॉसच्या सुरुवातीच्या काही भागात कोणताही सेलिब्रेटी घरात जाणार नसल्याचे कळतेय. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनंतर सेलिब्रटींची घरात एंट्री होणार आहे.