Join us

बिग बॉस : लोपामुद्राला तिच्या वडिलांनी स्वामी ओमविषयी दिला हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:02 IST

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनप्रमाणे याही सीझनमध्ये घरातील सदस्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तींना भेटण्यासाठी एक संधी दिली जात असल्याने, सध्या घरात इमोशनल ...

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनप्रमाणे याही सीझनमध्ये घरातील सदस्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तींना भेटण्यासाठी एक संधी दिली जात असल्याने, सध्या घरात इमोशनल वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार लोपामुद्राची बहीण भाग्यश्री हिने घरात एंट्री करीत तिची भेट घेतली. अतिशय भावुक अशा वातावरणात पार पडलेल्या या भेटीत भाग्यश्रीने स्वामी ओमविषयी वडिलांनी सांगितलेला संदेश लोपामुद्रापर्यंत पोहोचविला. }}}} आतापर्यंत घरात प्रियंका जग्गा हिचे मुले, मोनालिसाचा बॉयफ्रेंड, गौरव चोपडा आणि रोहन मेहराचे भाऊ घरात येऊन गेले. त्यांच्या येण्याने घरातील अशांत वातावरण पूर्णत: भावनिक झाले आहे. आता लोपाची बहीण भाग्यश्री हिने घरात तिची भेट घेतल्याने, लोपा खूपच भावुक झाल्याचे दिसले. दहा मिनिटाच्या भेटीत या दोघी बहिणींनी मराठी भाषेत संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. लोपाने भाग्यश्रीला ‘बाबा कसे आहेत’ असे विचारले. त्यावर तिने मराठी भाषेतच तिला उत्तर दिले. बहिणीला बघून लोपा खूपच भावनिक झाली होती. भाग्यश्रीला तिला सावरत ‘जास्त रडू नकोस मेकअप खराब होईल’ असे म्हटल्यानंतर तिच्या चेहºयावर काहीसे हसू फुलले. दोघी आपसात गप्पा मारत असताना, भाग्यश्रीने लोपासाठी वडिलांनी दिलेला संदेश सांगितला. ती म्हणाली की, ‘तू स्वामी ओमला एकेरी भाषेत बोलू नकोस, ते तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत’ असे सांगितले. तसेच तू खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेस, जास्त रडत जाऊ नकोस असेही भाग्यश्रीने तिला सांगितले. हे सर्व ऐकू न लोपा आणखीनच भावुक झाली. दोघी बहिणींच्या या भेटीने घरातील वातावरणाबरोबरच प्रेक्षकही भावनिक होतील, यात शंका नाही. }}}} वडिलांना बघून मनवीर झाला भावुकया भेटीत मनवीर गुर्जरच्या वडिलांनी घरात एंट्री केली. त्यांना बघून मनवीरच खूपच भावनिक झाला. वडील घरात येताच खाली बसून तो त्यांच्या पाया पडला. तसेच त्यांच्या गळ्यात पडून ढसढसा रडत होता. हे बघून घरातील अन्य सदस्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. मनवीर आणि त्याच्या वडिलांची भेट खूपच गहिवरून टाकणारी ठरली. यावेळी मनवीरने वडिलांना कॉफी देत त्यांच्याशी संवाद साधला. तू चांगला खेळत असल्याचा वडिलांनी त्याला सल्ला दिला. नीतिभाच्या आईचीही घरात एंट्रीनीतिभाच्या आईनेही घरात एंट्री करीत तिची भेट घेतली. दोघींची भेट खूपच भावुक ठरली. दहा मिनिटांच्या या भेटीत दोघींनी गप्पा मारल्या. आईला बघून हरखून गेलेल्या नीतिभाने तिला कडाडून मिठी मारली. तसेच घरातील इतर लोक कसे आहेत, याची विचारपूस केली. नीतिभाच्या आईने तिला काही टिप्सही दिल्या. यावेळी दोघीही भावुक झाल्या होत्या. बानी-गोहरची भेट?बानी जे आणि बिग बॉस सीझन-७ ची विनर गोहर खानची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघी एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी असल्याने गोहर तिला भेटण्यासाठी घरात आली होती; मात्र टास्कनुसार बॅटरी केवळ सहा टक्केच शिल्लक असल्याने तिला भेटण्यासाठी बिग बॉसने बानीला एक संधी दिली. त्यानुसार मनू पंजाबी आणि स्वामी ओम यांना पुढील आठवड्यासाठी स्वत:ला नॉमिनेट करावे लागणार होते. दोघांनी नॉमिनेट केल्यास बॅटरी शंभर टक्के चार्ज होणार होती. शिवाय बानीला गोहरची भेटही घेता येणार होती. त्यानुसार बानीने स्वामी ओम आणि मनू यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; मात्र स्वामी ओमने रिस्क घेणार नसल्याचे सांगितल्याने बानी चांगलीच अस्वस्थ झाली. ती घराच्या मुख्य दरवाजासमोर बानीचा धावा करत होती. आता बानी आणि गोहरची भेट होणार की नाही, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.