Join us
Daily Top 2Weekly Top 5

Big Boss 11 : शिल्पा शिंदे अन् हिना खानमध्येच टसन; ‘बिग बॉस’मध्ये येणार सर्वात मोठा ट्विस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 19:09 IST

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस ११’चा आज विजेता घोषित केला जाणार आहे. त्यामुळे विजेता कोण असेल? ...

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस ११’चा आज विजेता घोषित केला जाणार आहे. त्यामुळे विजेता कोण असेल? याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड आतुरता आहे. दरम्यान, विकास गुप्ता आणि पुनीश शर्मा विजेत्याच्या रेसमधून अगोदरच बाहेर पडले असल्याने हिना खान आणि शिल्पा शिंदे यांच्यात जबरदस्त टसन बघावयास मिळणार आहे. देशातील दोन मोठ्या लोकप्रिय कलाकारांमध्ये ही टसन होणार असल्याने यात कोण बाजी मारणार यावरूनही जोरदार चर्चा रंगली आहे. अशात बिग बॉस एक सर्वात मोठा ट्विस्ट घेऊन येणार असल्याने, विजेत्याबद्दल अंदाज लावणे सध्या तरी मुश्कील म्हणावे लागणार आहे. होय, तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या फेव्हरेट स्पर्धकाला वोट करत आला असाल अन् आता आपले काम संपले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घाई करत आहात असेच म्हणावे लागले. कारण बिग बॉस ट्विस्ट्सचा गेम असल्याने यामध्ये एक ट्विस्ट येणार असल्याची बातमी व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, टॉप २ मध्ये असलेल्या शिल्पा आणि हिना या दोघींपैकी एकीला विनर घोषित करण्याअगोदर पुन्हा एका लाइव्ह वोटिंग केले जाणार आहे. लाइव्ह वोटिंगच्या माध्यमातून हे स्पष्ट होणार की, दोघींपैकी कोण बाजी मारणार आहे? दरम्यान, मास्टर माइंड या नावाने प्रेक्षकांची मने जिंकणारा विकास गुप्ता शोच्या बाहेर झाल्याने आता हिना आणि शिल्पामध्ये अंतिम फाइट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांच्या मते, शिल्पा शिंदे या शोची विनर ठरणार आहे. परंतु बिग बॉसच्या या नव्या ट्विस्टमुळे आताच याबद्दल काहीही सांगणे मुश्कील आहे. दरम्यान, दोघींपैकी कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.