Join us  

Big Boss 11 : हिना खानने विकास गुप्तावर केला आरोप; म्हटले, ‘तू अशाप्रकारे टच करू शकत नाहीस’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 1:16 PM

एका टास्कदरम्यान हिना खान आणि विकास गुप्तामध्ये चांगलाच वाद झाला. त्यावरून दोघांनीही एकमेकांवर आरोप केले.

बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सध्या कॅप्टन बनण्याच्या टास्कवरून घरातील सदस्यांमध्ये घमासान बघावयास मिळत आहे. या टास्कदरम्यान स्पर्धक हिना खान हिने विकास गुप्तावर गंभीर स्वरूपाचा आरोप लावला आहे. हिनाने विकासला तू अशाप्रकारे टच करू शकत नसल्याचे म्हटले आहे. बिग बॉसने या आठवड्यात घरातील सदस्यांना कॅप्टनशिपचा एक टास्क दिला, ज्याचे नाव बीबी पोल्ट्री फॉर्म असे आहे. या टास्कवरून घरातील सदस्यांमध्ये चांगलेच घमासान बघावयास मिळत आहे. या टास्कमध्ये कॅप्टनशिपच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी आपला फोटो असलेले अंडे वाचवायचे आहे. कारण घरातील अन्य सदस्य ते अंडे घरातील स्विमिंग पूलमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न करतात. या टास्कमध्ये जेव्हा विकास गुप्ता त्याचा फोटो असलेले अंडे वाचविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच हिना त्याच्यावर हा आरोप लावते. बिग बॉसच्या ट्विटर पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये आज शोमध्ये प्रसारित होणारा काही भाग दाखविण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये विकास त्याचे अंडे घरातील इतर सदस्यांपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो. यावेळी शिल्पा शिंदे आणि हिना खान विकासचे अंडे त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. याचवेळी विकास आणि हिनामध्ये अंड्यावरून चांगलीच ओढतान होताना दिसते. याचवेळी दोघे खाली पडतात. मात्र खाली पडताच हिना विकासवर आरडाओरड करते. ती म्हणते की, ‘तू अशाप्रकारे टच करू शकत नाहीस’ यावर विकास म्हणतो की, तू टच केला तर चालतो अन् मी टच केला की लगेच आरडाओरड करतेस. त्यानंतर विकास म्हणतो की, स्वत: मुलांना धक्के देतेस वरून टचिंग मी टचिंग मी असे म्हणतेस. विकासचे हे शब्द हिनाला चांगलाच लागतात, ती विकासला म्हणते की, तू खूपच वाईट बोलत आहेस. त्यावर विकास म्हणतो की, स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊ नकोस.  त्यानंतर दोघांचा वाद शांत होतो तोच आकाश ददलानी अचानकच विकासचे अंडे घेऊन स्विमिंग पूलमध्ये फेकून देतो. हे बघून विकास दंग राहतो. तर दुसरीकडे हिना खान, शिल्पा शिंदे आणि आकाश चांगलेच सेलिब्रेशन करण्यास सुरुवात करतात. दरम्यान, मंगळवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्येदेखील अर्शी खानने हिना खानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आगामी काळात बिग बॉसच्या घरात आणखी हाणामारी बघावयास मिळणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.