Join us

Big Boss 11 : बिग बॉसच्या घरात यावेळी सलमान चक्क शांत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:39 IST

शनीवार १४ आॅक्टोबर आणि रविवार १५ आॅक्टोबर या विकेंडच्या दिवशी सलमान कुणालाही फटकारता दिसला नाही. पण सर्वांशी प्रेमाने बोलून ...

शनीवार १४ आॅक्टोबर आणि रविवार १५ आॅक्टोबर या विकेंडच्या दिवशी सलमान कुणालाही फटकारता दिसला नाही. पण सर्वांशी प्रेमाने बोलून सगळ्यांच्या चुका दाखवून देत होता. अर्शी आणि हितेन यांना मजेदार शैलीत लव्ह जोडी म्हणून निवड केली जाते आणि घरातील एका सोफ्यावर दोघांना बसण्याचे सांगितले जाते. अर्शी खूपच आनंदाने त्या सोफ्यावर बसते मात्र हितेनच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसत होते. हे पाहून सलमानला हसायला येते. सलमान खान जगातल्या सर्व्या कुत्र्यांची माफी मागतो. कारण एकदा सलमान जुबेरला कुत्रा म्हटला होता. तो माफी मागताना जुबेरचे नाव नाही घेत, मात्र अप्रत्यक्षपणे म्हणतो की मी कुणाला तरी कुत्रा म्हटलं होतो. आधी असं वाटलं होतं की, खरच सलमान जुबेरची माफी मागतोय, मात्र नंतर तो हसून बोलतो की, मी जगातील सर्व कुत्र्यांची माफी मागतोय की मी त्यांची जुबेरशी तुलना केली. कारण कुत्रे खूप फ्रेंडली असतात, प्रामाणिक असतात, मात्र जुबेर तसा अजिबात नाही. सलमान हसत हसत आकाशला ‘मिठी छुरी’ बोलतो जो आकाश खरच तसाच आहे. सलमान विकासला हेही बोलताना दिसतो की, कॅप्टन कॅप्टनचेच काम करताना दिसत नाही. दर रविवारी विकेंडच्या दिवशी आखाडाचा वार असतो, ज्या दिवशी दोन जणांना एकमेकांशी लढाई करावी लागते. यावेळी शिल्पा आणि अर्शी होते. यात अर्शी जिंकते. त्यानंतर ग्रॅँड दिवाळी सेल लागतो. त्यात ऋत्विक धनजी आणि रवी दुबे हे येतात. सर्वांना प्रेमाने भेटतात. लागलेल्या सेलमधून वस्तू विकत घेण्यासाठी स्पर्धकांना अगोदर कमाई करायची आहे. आणि त्या कमाईतून वस्तू खरेदी करायची आहे. कमाई करण्यासाठी एक वस्तू विकायची आहे, तर हिना विकते विकास ढोल, अर्शी विकते शिल्पा जलेबी आणि हितेन रसगुल्ला, आकाश विकतो लुसिंडा फ्रिज आणि सपना विकते पुनिश सोफा. सर्वजण आपापले टॅलेंट वापरुन आपल्या वस्तू विकतात.  १६ आॅक्टोबर हा नॉमिनेशनचा दिवस. यावेळी एक वेगळे इंस्टंट एव्हिक्शन होतं. यात बिग बॉस हे कंटेस्टंटला दोन नावे पुढे करायची आहेत. त्यात लव आणि लुसिंडाचे नाव येते. ज्यात लुसिंडाचे इंस्टंट एव्हिक्शन होते. भारतात जसे कांगारु दिसत नाहीत त्याच प्रकारे बिग बॉस हाऊसमध्ये लुसिंडाही दिसत नाही. असे गेल्या आठवड्यात सलमान बोलला होता.  यावरुन एकच हशा पिकला होता. पण ही गोष्ट खरी आहे की, लुसिंडाला हिंदी भाषा जास्त बोलता येत नव्हती म्हणून ती कुणाशी जास्त बोलत नसे म्हणून तिचे जाणे योग्यच होते. नेक्स्ट नॉमिनेशमध्ये सलमान विकासला अडचणीत टाकतो. त्यात त्याला सात नावे द्यायला लावतो. यात तो सपना, शिल्पा, हिना, पुनिश, आकाश, मेहजबिन आणि लव. आता घरातील प्रत्येकाला यांपैकी दोन नावे एव्हिक्शनसाठी द्यायचे आहेत. यात हितेन पुनिश आणि लव, मेहजबिन सपना आणि आकाश, सपना लव आणि हिना, लव हिना आणि सपना, हिना आकाश आणि पुनिश, पुनिश मेहजबिन आणि हिना असे एकमेकांना नॉमिनेट करतात. यात ज्याच्या विरोधात जास्त वोट असतात ते एव्हिक्शेनसाठी पात्र ठरतात. यात हिनाच्या विरोधात आठ व्होट, सपना-०४, पुनिश- ०४, लव- ०४ आणि आकाश- ०३ असे मत पडतात. आता पुढील दिवशी आकाश एव्हिक्शेनसाठी पात्र ठरल्यामुळे कशापद्धतीने आकाश-पाताळ करतो ते पाहूया...!