Join us

Big Boss 11 : ...या कारणामुळे बॉयफ्रेंडवर नाराज झाली हिना खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 19:47 IST

बिग बॉसच्या घरात सध्या शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांच्या नातेवाइकांनी प्रवेश केल्याचे बघावयास मिळत आहे. हे नातेवाइकांनी केवळ प्रवेशच केला ...

बिग बॉसच्या घरात सध्या शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांच्या नातेवाइकांनी प्रवेश केल्याचे बघावयास मिळत आहे. हे नातेवाइकांनी केवळ प्रवेशच केला नाही तर, एका टास्कमध्ये ते सहभागीदेखील झाले आहेत. गेल्यावेळेस जेव्हा हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल याने घरात एंट्री केली होती, तेव्हा हिनाने त्याच्यासाठी खूप अश्रू ढाळले होते. यावेळी तिने बॉयफ्रेंडसाठी बिग बॉसचेही ऐकले नव्हते. ज्यामुळे शिल्पा शिंदेने तिच्या मेलोड्रामाची खिल्ली उडविली होती. आता पुन्हा एकदा रॉकीने घरात एंट्री केली असून, तो हिनाची बाजू मांडताना दिसत आहे. परंतु हिना त्याच्या एका गोष्टीमुळे नाराज असल्याने या दोघांची भेट कितपत मनोरंजक ठरेल हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. त्याचे झाले असे की, रॉकीने नॅशनल टीव्हीवर असे काही वक्तव्य केले ज्यामुळे हिना त्याच्यावर रूसून बसली आहे. एक्स्ट्रा डोजमध्ये हिना लव त्यागीला सांगत आहे की, ‘रॉकीवर मी खूप नाराज आहे. कारण नॅशनल टीव्हीवर त्याने एकच जॅकेट दुसºयांदा परिधान केले आहे. वास्तविक त्याच्याकडे भरपूर जॅकेट्स आहेत. अशातही त्याने तेच कपडे का रिपीट केले? त्याचा हा स्वभाव मला अजिबातच आवडला नाही.’ तर दुसºया व्हिडीओमध्ये हिना लव याच्यावर नाराज होताना बघावयास मिळत आहे. कारण लव त्यागी तिला आउटफिट सिलेक्ट करण्यास अजिबातच मदत करीत नाही. व्हिडीओमध्ये दाखविले जाते की, हिना कपड्यांची निवड करताना काहीशी गोंधळलेली असते. तिला नेमके कोणते कपडे परिधान करायला हवेत, हे सूचत नाही. कारण तिच्याकडे सर्वच ड्रेस घालून झाले असल्याने, ते पुन्हा रिपिट करणे तिला योग्य वाटत नाही. अशात ती लवचा सल्ला घेते, परंतु तो तिला याकामी मदत करण्यास स्पष्ट नकार देतो. आता आपल्या बॉयफ्रेंडच्या जॅकेटवरून ती त्याच्यासोबत वाद तर घालणार नाही ना? अशी शंका आता प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.