Join us

'कॉमेडी दंगल मध्ये भोजपुरी स्टार रवी किशन ची 'लाफ्टर मॅरेथॉन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 12:14 IST

गेल्या काही आठवड्या पासून 'कॉमेडी दंगल' च्या विनोदी प्रतिभावंत कलाकारांनी प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे.  ते आपली विनोदशैली सादर करण्यासोबत ...

गेल्या काही आठवड्या पासून 'कॉमेडी दंगल' च्या विनोदी प्रतिभावंत कलाकारांनी प्रेक्षकांना आकर्षून घेतले आहे.  ते आपली विनोदशैली सादर करण्यासोबत जीवनातील तथ्यांना समोर आणतात आणि ह्यावेळी 'कॉमेडी दंगल' मध्ये लाफ्टर मॅरेथॉन पाहायला मिळणार आहे यामध्ये स्पर्धक दर्शकांना मनोरंजन करण्यासोबत परीक्षकावर आपली छाप पडण्यासाठी  एकामागोमाग एक उत्तम परफॉर्मन्स सादर करणार आहेत. शो मध्ये स्पेशल सेलिब्रिटी अतिथी म्हणून रवी किशन उपस्थित राहणार आहे. तो भारती सिंग आणि अनु मलिक सोबत  या विनोदी उत्साहामध्ये  सामील होणार आहे'कॉमेडी दंगल' च्या लाफ्टर मॅरेथॉन ची सुरवात लोकप्रिय अभिनेता रवी किशन च्या प्रवेशासह होणार आहे. तो लोकप्रिय भोजपुरी गाण्यावर थिरकतांना दिसणार आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवणासोबतच " ट्रेन की मोहब्बत" शी जुळलेल्या कथा सादर करत स्पर्धक त्यांच्या विनोदशैलीसह वास्तविक जीवनाला समोर आणतील. विकास गिरी ला त्यांच्या परफॉर्मन्स साठी स्टँडिंग ओव्हेशन मिळाले तर नेहा पेंडसेने मंचावर अनु मलिक, भारती सिंग व रवी किशन सोबत नृत्य सादर केले. या एपिसोडमध्ये शोमधील पूजा बॅनर्जी, शीखा सिंग, नेहा पेंडसे व भरती सिंग यांच्यातील बॉलीवूड जुगलबंदी पाहायला मिळणार आहे  आणि त्यांच्या लटके झटके ठुमक्या सोबत सेलिब्रिटी अतिथी रवी किशन सुद्धा थिरकतांना दिसणार आहे. अनु मलिक स्पर्धक शिखा सिंग साठी 'आग लाग दे' या उक्ती वर गाणे सादर करतांना दिसणार आहे.तर प्रेक्षक व इतर स्पर्धक तिची भरपूर प्रशंसा करतांना दिसणार आहे.खरच भारती सिंग, अनु मलिक आणि रवी किशन ह्यांच्यासोबत 'कॉमेडी दंगल' मधील लाफ्टर मॅरेथॉन हास्यजनक  विनोद, विलक्षण शायरी, आंबट-गोड तूतूमैमै भरपूर हास्यासह नॉन स्टॉपमनोरंजन देईल.