Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला स्वतःला आईच्या रुपात पाहायचं, पण...", प्रसिद्ध अभिनेत्रीचं मातृत्वाबद्दल भावुक वक्तव्य, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:19 IST

लग्नाला ९ वर्ष पूर्ण, आई होण्यासाठी आसुसली अभिनेत्री, दु:ख व्यक्त करत म्हणाली...

Actress Monalisa: मातृत्व ही जगातली एक सुंदर आणि अवर्णनीय भावना आहे. आई हा एक अनुभव आहे. एका स्त्रीसाठी तिच्या जन्माचे सार्थक हे आईपणात आहे. आई होण्यातील आनंद सारी दु:ख, वेदना यांचा विसर पडण्यास मदत करतो.आजच्या बदलत्या युगात मूल नको असं म्हणणाऱ्या अनेक महिला सापडतील.  मात्र, अशाही काही महिला आहेत ज्यांना इच्छा असूनही मातृत्वसुख मिळत नाही. आई होण्यासाठी त्या आसूसलेल्या असतात. कलाकार मंडळीही याला अपवाद नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एका लोकप्रिय अभिनेत्री तिच्या मनातील हे दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या अभिनेत्रीचं नाव मोनालिसा आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार्समध्ये मोनालिसाची गणना केली जाते.भोजपुरी सिनेमात काम करण्यासोबतच मोनालिसाने टीव्ही मालिकांमध्येही काम करून आपला ठसा उमटवला आहे.तसेच ती रिॲलिटी शो बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये देखील दिसली आहे. मोनालिसाने २०१७ मध्ये विक्रांत सिंग राजपूतशी लग्न केले. ती तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे.लग्नाला ९ वर्ष झाली असून ती आई होऊ शकली नाही.याच गोष्टीची चिंता अभिनेत्रीला कायम सतावते. नुकत्याच फिल्मीग्यान ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री भावुक होत म्हणाली,"मला स्वतःला आईच्या रुपात पाहायचं आहे. मला मुले हवी आहेत, पण ते खूप कठीण आहे.कारण मी खूप जास्त विचार करते आणि माझ्या मनात कायम नकारात्मक विचार येतात." अशा भावना अभिनेत्रीने मुलाखतीत व्यक्त केल्या. या सगळ्यात परिस्थितीत तिचा पती कायम आधार देत असल्याचं सुद्धा यावेळी अभिनेत्रीने सांगितलं. मोनालिसाचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे चाहते देखील भावुक झाले आहेत. 

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहां जायबा राजा नजरिया लडाईके' या पहिल्या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसा स्टार बनली. निरहुआसोबतचा तिचा पहिला भोजपुरी चित्रपट हिट ठरला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. भोजपुरी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी, उडिया आणि बंगाली भाषांमधील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Monalisa's motherhood desire: Actress expresses sadness about not being able to conceive.

Web Summary : Actress Monalisa, a Bhojpuri star, expressed her desire to experience motherhood in a recent interview. After 9 years of marriage, she is saddened by her inability to conceive, attributing it to negative thoughts. Her husband provides constant support.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी