Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया-रणवीरच्या 'व्हॉट झुमका...' गाण्यावर थिरकली भाविका शर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 17:02 IST

‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेत सावीची भूमिका साकारणारी भाविका शर्मा यंदाच्या २३व्या ‘आयटीए’ पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी झाली होती. तिने या सोहळ्यात आलिया भट आणि रणवीर सिंगच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर नृत्य सादर केले.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेत सावीची भूमिका साकारणारी भाविका शर्मा यंदाच्या २३व्या ‘आयटीए’ पुरस्कार  सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी झाली होती. तिने या सोहळ्यात आलिया भट आणि रणवीर सिंगच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर नृत्य सादर केले. 

भाविका शर्मा ऊर्फ सावी या पुरस्कार सोहळ्यातील परफॉर्मन्सबद्दल म्हणाली की, २३व्या ‘आयटीए’ पुरस्कार सोहळ्याबाबत मला खूपच उत्कंठा होती; या सोहळ्यात मी पहिल्यांदाच सहभागी होऊन माझे नृत्य पेश केले. पहिला परफॉर्मन्स हा कुठल्याही कलाकाराकरता नेहमीच खास असतो आणि त्यामुळे हा क्षण अर्थातच माझ्याकरता अमूल्य होता. मी माझा सहकलाकार शक्ती अरोरा याच्यासोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणे सादर केले. मला आशा आहे की, प्रेक्षकांना आमचे सादरीकरण आवडेल आणि मी त्याबाबत अत्यंत उत्सुक आहे.

टेलिव्हिजन आणि चित्रपटांत बजावलेल्या उत्तम कामगिरीकरता प्रतिभावंत कलाकारांना ‘आयटीए’ पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. १० डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मनोरंजन जगतातील बडे कलावंत आवर्जून उपस्थित होते. या सोहळ्यात हृतिक रोशन, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकर, विजय वर्मा, शोभिता धुलिपाला या दिग्गज बॉलिवूड कलाकारांसह रूपाली गांगुली, हर्षद चोपडा, प्रणाली राठोड, सायली साळुंखे, विशाल आदित्य सिंग, शालिन भानोत, भाविका शर्मा, शक्ती अरोरा, विजयेंद्र कुमेरिया, हिमांशी पराशर, नवनीत मलिक, खुशी दुबे हे कलाकार उपस्थित होते. इंडियन टेलिव्हिजन अॅकॅडमीच्या पुरस्कार वितरण सोहळा ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ३१ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होईल.