Join us

भाविका शर्माने केला हा थरारक स्टंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 20:35 IST

‘जीजी माँ’ मालिकेत नियती पुरोहित या नायिकेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री भाविका शर्माने नुकतेच एका अपहरणाच्या दृश्यासाठी चित्रीकरण करताना आपल्या आयुष्यातील सर्वांत थरारक आणि भीतीदायक असा स्टंट केला.

टीव्हीच्या पडद्यावर सफाईदार अभिनय पाहताना असा अभिनय करण्यासाठी संबंधित कलाकाराला किती अडचणींना तोंड द्यावे लागले असेल, याची कल्पना प्रेक्षकांना कधीच येत नाही. पटकथेच्या मागणीमुळे या कलाकारांना कधी कधी काही थरारक, स्टंट प्रसंग साकारावे लागतात, जे त्यांनी त्यापूर्वी कधीच केले नसतात किंवा तशा प्रसंगांची त्यांना सवयही नसते. ‘स्टार भारत’वरील ‘जीजी माँ’ मालिकेत नियती पुरोहित या नायिकेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री भाविका शर्माने नुकतेच एका अपहरणाच्या दृश्यासाठी चित्रीकरण करताना आपल्या आयुष्यातील सर्वांत थरारक आणि भीतीदायक असा स्टंट केला. 

नियतीला किडनॅपर्स अडवतात आणि सुटण्यासाठी ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. मग किडनॅपर्स तिला पकडतात आणि तिला जमिनीपासून १५० फूट वर बांधतात. ते तिचे हात आणि तोंडही बांधतात म्हणजे तिला पळून जाण्यासाठी काहीच संधी उरत नाही. अशा प्रकारचे थरारक दृश्य ती प्रथमच चित्रीत करत होती. यासाठी भाविकाला खरोखरीच धैर्याची गरज होती. कारण तिला उंचीची भीती आहे. १५० फूट उंचीवरील क्रेनला हात आणि तोंड बांधून अडकवलेले असणे हे भाविकासाठी खरोखरीच एक मोठे शारीरिक आणि मानसिक आव्हान होते.भाविका उत्साहाने म्हणाली, “त्या क्रेनला पाहून त्यावर मला बांधले असल्याचे दृश्य इमॅजिन करून मला वाटले की आता मी काही परत येत नाही. मला उत्साहही वाटत होता आणि भीतीसुद्धा कारण असा अनुभव मी कधीच घेतला नव्हता. पण हे साकारताना मला काही समस्या आली नाही याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी ते एखाद्या साहसापेक्षा कमी नव्हते.”