Join us
Daily Top 2Weekly Top 5

एल्विश यादव लग्न करतोय, भारती सिंगनं केलं कन्फर्म, कोण आहे मुलगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:04 IST

एल्विश यादवचं लग्न ठरलं! भारती सिंग म्हणाली...

Elvish Yadav Wedding: प्रसिद्ध युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी २' चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चर्चेत आलाय.  सध्या तो 'लाफ्टर शेफ्स २'(Laughter Chefs 2) मध्ये दिसत आहे. अलीकडेच या शोचा एक प्रोमो व्हायरल झाला असून त्यात एल्विश लग्नाबद्दल सूचक वक्तव्य करताना दिसला होता. सुरुवातीला प्रेक्षकांना वाटलं की ही टीआरपीसाठीचा स्टंट असावा. पण, आता कॉमेडियन भारती सिंगनं स्वतः या बातमीला दुजोरा दिलाय. 

अलीकडेच भारती सिंगनं पापाराझींशी बोलताना एल्विशच्या लग्नावर भाष्य केलं. भारती म्हणाली, "मी आधीच सांगितलंय ना, तो लग्न करणार आहे". यावर पापाराझींनी विचारलं, "कधी?" त्यावर भारती हसत उत्तर दिलं, "या वर्षी होणार आहे". पण, यावेळी भारतीनं एल्विश यादव कुणाशी लग्न करतोय, याबद्दल सांगितलं नाही. 

एल्विश यादव लग्न कोणाशी करतोय?एल्विशच्या होणाऱ्या पत्नीविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जेव्हा शोमध्ये कृष्णा अभिषेकने एल्विशला त्याच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल विचारलं, तेव्हा एल्विशनं केवळ तिचं नाव न घेता 'उदयपूर'चा उल्लेख केला. त्यामुळे त्याची होणारी पत्नी ही उदयपूरची असावी असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. 

टॅग्स :भारती सिंगसेलिब्रिटीबिग बॉस