Join us

OMG!! भारती सिंगच्या मानधनात मोठी कपात, ‘द कपिल शर्मा शो’साठी अर्ध्या पैशात करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:15 IST

भारती सुमारे 7 महिन्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून टीव्हीवर वापसी करतेय. अर्थात ही वापसी करताना तिला अर्ध्या पैशांवर पाणी सोडावं लागणार आहे.

ठळक मुद्देआम्ही एकत्र काम करू आणि या संकटातून बाहेर पडू, असंही भारती म्हणाली.

कोरोना महामारीमुळं उद्योगधंदे-व्यापार ठप्प पडला. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीलाही मोठा फटका बसला. सामान्य माणसाला कोरोनानं प्रभावित केलंच, पण सेलिब्रिटीही यातून सुटले नाहीत. नवे शो व चित्रपट ब-याच अंशी खोळंबले आहे आणि जुने शो कसेबसे पुढे रेटले जात आहेत. याचा थेट परिणाम कलाकारांवर होतोय. अनेक छोट्या कलाकारांना काम नाही. ज्यांच्याकडे काम आहे, त्यांच्या मानधनात कपात करण्यात येत आहे. कॉमेडियन भारती सिंग  (Bharti Singh) त्यापैकीच एक. कोरोनामुळे फीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाल्याची कबुली भारतीनं खुद्द दिली आहे.

भारती सुमारे 7 महिन्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून (The Kapil Sharma Show) टीव्हीवर वापसी करतेय. अर्थात ही वापसी करताना तिला अर्ध्या पैशांवर पाणी सोडावं लागणार आहे. भारतीच्या मानधनात मेकर्सनी 50 टक्क्यांची कपात केली आहे.  एका मीडिया रिपोर्टनुसार, 'डान्स दिवाने' हा शो होस्ट करण्यासाठी भारतीला तिची फी 70 टक्क्यांनी कमी करावी लागली आहे. मानधन कपातीमुळे भारती दु:खी तर आहे. पण काहीच नसल्यापेक्षा हे बरं, असं म्हणून तिनं स्वत:चं समाधान केलं आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. भारती म्हणाली, पे कटबद्दल विचारणा झाली, तेव्हा हा सर्वांनाच मोठा क्का होता. मी सुद्धा याला अपवाद नव्हती. मी यावर मेकर्सशी खूप चर्चा केली. पण गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळं जी परिस्थिती ओढवली आहे, ते बघता हे स्वाभाविक आहे. काम बंद झालं, टीव्ही व शोला स्पॉन्सर्स सापडेनासे झालेत.अशात चॅनल्स कुठून पैसा आणणार? प्रत्येक जण या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या शोचं रेटींग चांगलं झालं तर कदाचित मेकर्स स्वत:चं आमची फी वाढवतील. आम्ही इतक्या वर्षांपासून टीव्हीवर काम करतोय. त्या इतक्या वर्षांत त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट मान्य केली. आता त्यांना मदतीची गरज आहे तर कलाकारांनी याला विरोध करावा, असं मला वाटत नाही. फक्त सेटवरच्या टेक्निशिअन्सच्या पगारात कपात होऊ नये, असं मला वाटतं. आम्ही एकत्र काम करू आणि या संकटातून बाहेर पडू, असंही भारती म्हणाली.

टॅग्स :भारती सिंगद कपिल शर्मा शो