Join us

भारती सिंग बनली ज्योतिषी, सांगितले खतरों के खिलाडी ९च्या विजेत्याचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 20:00 IST

खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या फिनालेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून भारती सिंगने विजेत्याचे भविष्य स्वतः वर्तवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभारती शमिता शेट्टीकडे वळली आणि तिला शंतनू माहेश्वरीच्या केसापासून बनलेला ताईत तिने भेट दिला. तिने तो ताईत तिला शेवटच्या क्षणापर्यंत घालायला सांगितला. कारण शंतनू मागच्या सिझनचा विजेता होता आणि त्याचे आशीर्वाद त्या ताईतमध्ये बांधलेले आहेत असे तिने सांगित

भारती सिंगने कलर्सच्या खतरों के खिलाडी ९ वर तिची साहसी आणि एक वेगळी बाजू दाखवून दिली. हास्य हा तिचा विशेष गुण असला तरी तिने हरण्याची भीती न बाळगता या कार्यक्रमात आव्हानांचाही सामना केला. या संपूर्ण सिझनमध्ये भारतीने तिच्या हुशारीने आणि विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे एवढेच नाही तर ती एक डेअरडेव्हिल आहे हे सुद्धा तिने सिद्ध केले. 

खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या फिनालेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून भारती सिंगने विजेत्याचे भविष्य स्वतः वर्तवण्याचा निर्णय घेतला आहे. ती आता एक टॅरोट कार्ड रिडर बनली असून ट्रॉफी कोण जिंकेल याचे भविष्य सांगत आहे. अनेक कार्डमधून एक कार्ड काढण्यासाठी तिने एक पोपट देखील आणला असून भारती सिंगने अली गोनीला सल्ला दिला की, जर त्याने पाण्याच्या भीतीवर मात केली तर त्याला शो जिंकण्याची जास्त संधी असेल. या भीतीवर मात करण्यासाठी शेवटच्या स्टंटपर्यंत एका शेळीला दूध देण्यास त्याला भारतीने सांगितले आणि तिने मजेशीररित्या रिधिमा पंडितचा उल्लेख शेळी असा केला. त्यानंतर ती शमिता शेट्टीकडे वळली आणि तिला शंतनू माहेश्वरीच्या केसापासून बनलेला ताईत तिने भेट दिला. तिने तो ताईत तिला शेवटच्या क्षणापर्यंत घालायला सांगितला. कारण शंतनू मागच्या सिझनचा विजेता होता आणि त्याचे आशीर्वाद त्या ताईतमध्ये बांधलेले आहेत असे तिने सांगितले. 

शेवटी भारतीने स्टंट मास्टरलासुद्धा लक्ष्य बनवले. रोहित शेट्टीसाठी तिने एक कार्ड उचलले आणि हॉलिवूडमध्ये त्याच्या प्रवेशाचे भविष्य वर्तवले. शूटच्या वेळी उपस्थित असणाऱ्या एकाने सांगितले की, “भारती सिंग नेहमीच टीममधील सर्वात जास्त मनोरंजन करणारी स्पर्धक राहिली आहे. तिचा सहभाग आणि स्पर्धात्मक भावनेमुळे ती शो मधील सर्वात लाडकी व्यक्ती बनली. ती नेहमीच एखादी गंमत करताना किंवा प्रँक करताना दिसते आणि यावेळी तर तिने टॅरोट कार्ड वाचक बनून शो मधील प्रत्येक स्पर्धकाचे भविष्य वर्तवण्याचे ठरविले.”

टॅग्स :भारती सिंग