Bharti Singh Post: लोकप्रिय कॉमेडियन आणि लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह दुसऱ्यांचा आई झाली आहे. भारतीने १९ डिसेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. भारती आणि पती हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई-बाबा झाल्याची माहिती दिली होती. त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. भारती आणि हर्ष यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला असून त्यांनी आता महिनाभरानंतर लाडक्या लेकीचं बारसं केलं आहे. नुकतंच त्यांनी आपल्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी लेकाच्या जन्माच्या दोन महिन्यानंतर छोटीशी झलक दाखवली आहे. भारतीने तिच्या मुलाचं नाव यशवीर ठेवलं आहे. या फोटोमध्ये भारतीने तिच्या मुलाला हातात घेतलं आहे. तर त्यांचं चौकीनी कुटुंब एकत्र पाहायला मिळतंय. या फोटोंमध्ये भारती-हर्षच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत आहे.
काय आहे नावाचा अर्थ?
भारती सिंहने मुलाचं अगदी साधं आणि अर्थपूर्ण असं नाव ठेवलं आहे. यशवीर या नावाचा मराठीत अर्थ गौरवशाली आणि शूर असा आहे. दरम्यान, भारती आणि पती हर्षने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
भारती सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने २००८ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. २००९-१० मध्ये कॉमेडी सर्कसमध्येही झळकली. याशिवाय भारतीने पंजाबी चित्रपट 'नूर' तसेच अक्षय कुमारच्या 'खिलाडी ७८६' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Web Summary : Comedian Bharti Singh and Harsh Limbachiyaa named their son Yashveer, meaning glorious and brave. They shared heartwarming photos, celebrating as a happy family, garnering wishes from fans and celebrities.
Web Summary : कॉमेडियन भारती सिंह और हर्ष लिंबाचिया ने अपने बेटे का नाम यशवीर रखा, जिसका अर्थ है गौरवशाली और बहादुर। उन्होंने खुशी से परिवार के रूप में जश्न मनाते हुए दिल को छू लेने वाली तस्वीरें साझा कीं, प्रशंसकों और हस्तियों से शुभकामनाएं प्राप्त हुईं।