भारतीने उचलले देबिनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:22 IST
भारती सिंगच्या कॉमेडी टायमिंगचे असंख्य चाहते आहेत. ही कॉमेडी क्विन लवकरच डॉ. मधुमती ऑन ड्युटी या कार्यक्रमात झळकणार आहे. ...
भारतीने उचलले देबिनाला
भारती सिंगच्या कॉमेडी टायमिंगचे असंख्य चाहते आहेत. ही कॉमेडी क्विन लवकरच डॉ. मधुमती ऑन ड्युटी या कार्यक्रमात झळकणार आहे. या कार्यक्रमात ती एका पैलवानपट्टूची भूमिका साकारणार आहे. ती मधुमतीसाठी तिच्या मुलाचे स्थळ घेऊन येणार आहे. भारतीच्या एंट्रीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार यात काही शंकाच आहे. याविषयी देबिना बॅनर्जी सांगते, "भारतीसोबत काम करायला खूप मजा आली. ती खूपच चांगली कलाकार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दृश्यात तिने मला उचलले होते. तिच्यासोबत चित्रीकरणाचा अनुभव हा खूपच छान होता."