भरत जाधव दिसणार ' एक कुतुब तीन मिनार' मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 09:31 IST
मराठी इंडस्ट्रीला एक वेगळया शिखरावर पोहोचविण्यासाठी अभिनेता भरत जाधव यांचे देखील महत्वपूर्ण कार्य आहे. अगं बाई अरेच्चा २, खो-खो, ...
भरत जाधव दिसणार ' एक कुतुब तीन मिनार' मध्ये
मराठी इंडस्ट्रीला एक वेगळया शिखरावर पोहोचविण्यासाठी अभिनेता भरत जाधव यांचे देखील महत्वपूर्ण कार्य आहे. अगं बाई अरेच्चा २, खो-खो, येडयांची जत्रा, क्षणभर विश्रांती यांसारखे एकसे एक मराठी चित्रपट देणारे भरत जाधव आता, 'एक कुतुब तीन मिनार' या चित्रपटातून झळकणार आहे. सुनिल कांबळे दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव प्रमुख भूमिकेत असून विजय चव्हाण, संचित यादव, श्याम ठोंबरे, पूर्णिमा काव्हळ, अमृता देशमुख, पूजा कदम, अशोक सकने, नितीन पारेगावकर, सुरेश ढगे, प्रियांका मुणगेकर, विजय कदम, रसिका धामणकर, चंदू कांबळे, अतुल मचंर्डे, अमित शिंदे, गौरी केंद्रे या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट मसालापट असला तरी यातून एक अंडरकरंट मॅसेज मिळणार आहे. तसेच रत्नागिरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणावरील वेगवेगळ्या लोकेशन्सकर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती मनोज यादव आणि अनिल सिंग यांनी केली आहे. हा चित्रपट १५ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.