Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरत गणेशपुरे इंडियन मझाक लिगमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 17:38 IST

मराठी कार्यक्रमात आपल्या स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता भरत गणेशपुरे आता हिंदी कार्यक्रमात झळकणार आहे. इंडियन मझाक लिग ...

मराठी कार्यक्रमात आपल्या स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता भरत गणेशपुरे आता हिंदी कार्यक्रमात झळकणार आहे. इंडियन मझाक लिग हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात क्रिकेटर शोएब अख्तर, द कपिल शर्मा शो या मालिकेतील चंदन प्रभाकर झळकणार आहेत. त्यांच्यासोबत आता भरत गणेशपुरेचीही या मालिकेत वर्णी लागली आहे. भारतने याआधीही मिसेस तेंडुलकर या हिंदी मालिकेत काम केले होते. इंडियन मझाक लिग या कार्यक्रमाद्वारे भरत कित्येक वर्षांनंतर पुन्हा हिंदीत काम करत आहे. भरतला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी या मालिकेद्वारे खूप चांगले व्यासपीठ मिळालेले आहे.