भाविका शर्मा स्वतःला समजते आलिया भट्ट,जाणून घ्या काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 11:59 IST
अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत.शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची ...
भाविका शर्मा स्वतःला समजते आलिया भट्ट,जाणून घ्या काय आहे कारण?
अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत.शेवटी आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो.त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.रसिकांचे आपल्या अभिनयातून कसे मनं जिंकता येतील यासाठी प्रत्येक कलाकार खूप प्रयत्नशील असतो.त्यासाठी तो कधी कधी त्याला प्रेरणा देणा-या कलाकाराशी आपला अभिनय कसा मिळताजुळता होईल यासाठीही खूप मेहनत घेत असतो. अशीच एक अभिनेत्री स्वतःला बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे आपला स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ती अभिनेत्री म्हणजे ‘जीजी माँ’ या मालिकेत नियतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाविका शर्मा. भाविका एका बॉलिवूड अभिनेत्री खूप मोठी फॅन आहे.इतकेच नाहीतर ती फक्त फॅन नाही तर ती स्वतःला खुद्द आलिया भट्ट समजते. ती आलिया सारखी दिसते असे भाविकाला वाटते.म्हणूनच चार्मिंग आलिया प्रमाणे सेटवरही सगळेच तिला आलिया म्हणूनच बोलवतात असेही ती सांगते.आलिया आणि भाविकामध्ये अनेक साम्य असल्याचे तिला वाटते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आलिया सिनेसृष्टीत वयाने लहान असलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे भाविकाही टीव्ही इंडस्ट्रीत वयाने लहान असणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचे बरेच लाड केले जातात तशीच तिची बरीच थट्टाही केली जाते.बॉलिवूडची सर्वात गोड दिसणारी अभिनेत्री आलिया भट्टशी आपली तुलना केली जात असल्याने भाविका खूपच भारावून गेली आहे.“लोकांना वाटतं की मी आलिया भटसारखी दिसते. माझे निर्माते यांनाही तसंच वाटत असल्यानेच त्यांनी मला ‘जीजी माँ’मधली ही भूमिका देऊ केली.वस्तुत: मला स्वत:ला मी आलियासारखी दिसते, तसेच मला ब-याचदा आलियाप्रमाणे दिसते अशा प्रतिक्रीया मिळतात तेव्हा तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास ठेवते.” असे भाविकाने सांगितले.“आमच्या मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत वाढ होत असून प्रेक्षकांचं आमच्यावर असंच प्रेम कायम राहो, इतकीच मी अपेक्षा करते,” असे ती शेवटी म्हणाली.