Join us

'भाग्य दिले तू मला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, राज - कावेरीच्या सुंदर नात्याची सुरुवात होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:30 IST

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील राज आणि कावेरीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला (Bhagya Dile Tu Mala ) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील राज आणि कावेरीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आता मालिकेत राज आणि वैदेहीचं लवकरच लग्न पार पडणार आहे. मात्र अजूनही राज लग्नासाठी कावेरीच्या होकाराची वाट पाहत आहे. त्यामुळे पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

भाग्य दिले तू मला मालिकेत राज आणि कावेरी एकमेकांना आपल्या मनातील भावना कधी व्यक्त करणार ? राज कावेरी कधी एकत्र येणार ? या दोघांचे लग्न कधी होणार ? असे अनेक प्रश्न आणि याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. मालिका सुरू झाल्यापासूनच बोक्या आणि काकूच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यांच्यातील लुटूपुटूची भांडणे असो वा कावेरीने राजची समजूत काढणे असो वा राजने कावेरीला आधार देणे, त्यांच्यात आलेला दुरावा असो प्रेक्षकांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही. पण, कावेरीने तिच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच वैदेहीसाठी प्रेमाचा त्याग केला. वैदेहीने कावेरी पासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या, खोटं वागली. पण आता मात्र वैदेहीचा खरा चेहरा कावेरी सगळ्यांसमोर आणणार आहे. 

कावेरीच्या हाती तिने राजला लिहिलेले पत्र  लागणार आहे ज्यावरून वैदेहीचा पर्दाफाश होणार आहे ... भर मंडपात कावेरी लग्न थांबवणार आहे आणि वैदेहीच्या कानफडीत मारणार आहे...  आता सगळ्या प्रकारामुळे राज - कावेरीच्या सुंदर नात्याची सुरुवात होणार ? राज वैदेहिचे लग्न होणार ? या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :कलर्स मराठी