Join us
Daily Top 2Weekly Top 5

So Romantic ! फुलांच्या पायघड्या अन्... ; पती शार्दूलने नेहा पेंडसेला दिले रोमॅन्टिक सरप्राईज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 17:14 IST

नेहा पेंडसे हिचा व्हॅलेन्टाईन डे अगदीच खास होता. अगदी दृष्ट लागावी इतका खास. थाट तर असा की विचारू नका.

ठळक मुद्देसध्या नेहा पेंडसे ‘भाबीजी घर पर है’ मालिकेत  अनिता भाभीच्या भूमिकेत दिसतेय.

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा व्हॅलेन्टाईन डे अगदीच खास होता. अगदी दृष्ट लागावी इतका खास. थाट तर असा की विचारू नका.होय, नेहाने कालचा व्हॅलेन्टाईन डे पती शार्दून बयाससोबत अतिशय रोमॅन्टिक अंदाजात साजरा केला. शार्दूलने नेहासाठी खास रोमॅन्टिक डिनर प्लान केले होते. नेहासाठी खास फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या.

पीच कलरचा मेक्सी गाऊन घातलेली नेहा या फुलांच्या पायघड्यावरून झक्कास एन्ट्री घेते. शार्दूल तिची प्रतीक्षा करत असतो. दोघे जवळ येताच आणि एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेत, प्रेम व्यक्त करतात. यानंतर दोघेही डिनर टेबलकडे वळतात. नेहाने या क्षणाचा सुंदर व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. 

‘मे आय कम इन मॅडम’ या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली होती.आपल्या सहका-यांशी बिनधास्त फ्लर्ट करणारी बॉस रसिकांना चांगलीच भावली होती.  या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.

सध्या नेहा पेंडसे ‘भाबीजी घर पर है’ मालिकेत  अनिता भाभीच्या भूमिकेत दिसतेय. आधी ही भूमिका सौम्या टंडन साकारत होती.बिंधास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे गतवर्षी उद्योगपती शार्दुलसोबत लग्नबेडीत अडकली होती. तिच्या लग्नाचे फोटो आणि सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते.      

 

टॅग्स :नेहा पेंडसे