Join us

​‘भाभी जीच्या’ घरी भूताची एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:40 IST

‘भाभी जी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील मालिका रसिकांचं मनोरंजन करतेय. रसिकांना पोट धरुन हसवणा-या या मालिकेत लवकरच एका ...

‘भाभी जी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील मालिका रसिकांचं मनोरंजन करतेय. रसिकांना पोट धरुन हसवणा-या या मालिकेत लवकरच एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. हा पाहुणा तुम्हाला हसवेल मात्र अंगूरी भाभी आणि तिवारीजी यांच्यासाठी हा नवा पाहुणा मात्र डोकेदुखी ठरणार आहे.. मालिकेच्या आगामी भागात अनिता भाभी भूत बनल्याचं पाहायला मिळेल.. यात तिला साथ लाभणार आहे ती पती विभूती नारायण मिश्रा यांची.. या दोघांनाही एका भूतानं पछाडलंय ज्याची खबर त्यांनाही नाही.. अंगूरी भागी आणि तिवारीजी यांच्या घरीसुद्धा याचे परिणाम दिसू लागलेत. आता पाहावं लागेल की हे भूत रसिकांना किती हसवतंय आणि मालिकेतील शेजा-यांना कसं पिडतंय..