Join us

बेलाने गायिले टायटल साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:59 IST

'मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गायिका बेला शेंडे हिने नुकतेच एका मालिकेचे ...

'मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गायिका बेला शेंडे हिने नुकतेच एका मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे. नकुशी...तरीही हवीहवीशी' असे या मालिकेचे नाव आहे. बेलाना बऱ्य़ाच दिवसानंतर एखाद्या मालिकेच्या शीर्षक गीताला आपला आवाज आहे. नकुशी चे शीर्षक गीत नुकतेच सोशलमीडियावर अपलोड करण्यात आले. तिच्या या शीर्षक गीताचे सोशलमीडियावर सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्याला गायक महेश काळे याने संगीत दिले आहे. तर समीर सामंत यांनी हे गीत लिहीले आहे.