Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेगुसराईचा शेवट गोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:48 IST

बेगुसराई ही मालिका येत्या २४ तारखेला संपणार असून या मालिकेच्या शेवटी अनन्या आणि बिंदिया या दोघांमध्ये इतक्या महिन्यांपासून असणारी ...

बेगुसराई ही मालिका येत्या २४ तारखेला संपणार असून या मालिकेच्या शेवटी अनन्या आणि बिंदिया या दोघांमध्ये इतक्या महिन्यांपासून असणारी भांडणं मिटणार आहेत. मालिकेत सतत अनन्या आणि बिंदिया यांच्यात प्रचंड वादविवाद होत असतात. पण आता बिंदियाला आपली चूक कळणार आहे. बिंदियाला आदर्शच्या लग्नाबाबतचे गुपित कळणार असून यामुळे त्यांच्या घरात खूप वाद निर्माण होणार आहेत तर दुसरीकडे नेहमी स्त्रीचा अनादार करणाऱ्या बिंदियाला अनन्या स्त्रीचे महत्त्व किती असते हे पटवून देणार आहे. यामुळे बिंदीयाला तिच्या चुकीची जाण होणार आहे आणि ती अनन्याला तिचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याची परवानगी देणार आहे. या सगळ्यामुळे मालिकेचा शेवट अतिशय गोड होणार आहे.