Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सरगम'मध्ये रंगणार अशोक पंक्तींची सुमधुर गाणी,सुरेखा पुणेकरची अस्सल लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 12:11 IST

'सरगम'च्या पहिल्या भागात सुमधुर संगीत तर दुसऱ्या भागात अप्रतिम लावण्या आपल्याला अनुभवायला मिळतील. अशोक पत्की यांनी गेली  चार दशके ...

'सरगम'च्या पहिल्या भागात सुमधुर संगीत तर दुसऱ्या भागात अप्रतिम लावण्या आपल्याला अनुभवायला मिळतील. अशोक पत्की यांनी गेली  चार दशके  मराठी संगीत क्षेत्रातील लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. आजवर त्यांनी ५० सिनेमे,५०० भक्तिगीते तर २५० नाटकांना संगीत दिले आहे.अशी संगीत क्षेत्रातील व्यक्ती जेव्हा सरगम सारख्या संगीतमय कार्यक्रमात येते तेव्हा अनेक सुमधुर गीते प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील त्याच प्रमाणे अनेक दुर्मिळ किस्से सुद्धा ऐकायला मिळतील .'सरगम'चा पुढचा भाग अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेल्या सदाबहार गाण्याच्या कार्यक्रमाने रंगणार आहे. तसेच मराठीमधील अप्रतिम  लावण्या प्रेक्षकांना  पहायला मिळणार आहेत.तसेच 'सरगम'मध्ये अशोक पत्कींच्या पहिल्या भागात केतकीच्या बनी तिथे, तू सप्तसूर माझे, दिस चार झाले मन, ढग दाटुनी येतात, राधे कृष्ण  नाम आणि मिळे सूर मेरा तुम्हारा ही गाणी असून या भागात माधुरी करमरकर,मंदार आपटे, साधना सरगम,कल्याणी साळुंखे आपटे, हृषीकेश रानडे हे गायक आपली कला सादर करणार आहेत.तर लावणी स्पेशल भागात कसं काय पाटील बरं हाय का,पाडाला पिकलाय आंबा, पिंगा,इंद्रपुरीच्या मेनका नी  रंभा, झाल्या तिन्ही सांजा, या रावजी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल,पसारा आली आणि वाजले कि बारा या लावण्या सादर होणार आहेत.जुईली जोगळेकर, वैशाली माडे, प्रवीण कुंवर, सुरेखा  पुणेकर त्यांच्या अप्रतीम आवाजाने लावण्या गाणार आहेत.'सरगम' शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे.