Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करताय सावधान! या मालिकेतील बिन बुलाये मेहमान लावू शकतात तुमच्याही लग्नात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 15:00 IST

पाहुण्यांप्रमाणेच वधू-वरालाही आपल्या आवडत्या कलाकरांनी लग्नात हजेरी लावल्यामुळे खूप आनंद झाला होता. स्वप्नातही विचार करू शकत नाही अशा प्रकारे या कलाकरांनी या जोडप्याला दिलेले सरप्राईज हे त्यांच्यासाठी आयुष्यभर गोड आठवण बनून राहणार आहे.

प्रत्येकासाठी आपले लग्न हा आयुष्यातला एक खास सोहळा असतो.हेच खास क्षण आयुष्यभर गोड आठवण बनून रहावे यासाठी प्रत्येक जण काही ना काही खास गोष्टी करत असतो.त्यात होणा-या लग्नसोहळ्या आवडत्या कलाकरांनी हजेरी लावली तर तो क्षण आणखी खास बनतो.असाच एक सुखद धक्क एका नवीन जोडप्यांना मिळाला.चक्क लग्नाच्या वरातीत वाजत-गाजत  टीव्ही कलाकार तस्निम शेख,अभिषेक मलिक  आणि सोनाली निकम यांनी या लग्न सोहळ्यात नुसती हजेरीच लावली नाही तर या वधू वराला शुभेच्छा देत भेटवस्तूही दिल्या.'एक विवाह ऐसा भी' या मालिकेची कलाकरांनी या लग्नसहोळ्यात लावलेली उपस्थितीने सोहळ्यात रंगत आणली होती.इथे येणारे पाहुणे मंडळींचीही या कलाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छाही पूर्ण झाली.आपल्या आवडत्या कलाकरांबरोबर फोटो काढायला मिळाल्याने या लग्नातील पाहुणे मंडळीही खूश झाले होते.'एक विवाह ऐसा भी' मालिका 'लग्न' या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे मालिकेच्या प्रमोशनसाठी ही मंडळीं  निमंत्रणाशिवाय थेट या लग्नात येऊन पोहोचले होते. लग्न घरातील मंडळींना याविषयी कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती.याविषयी तस्निम शेख म्हणाली,असं विना निमंत्रण या लग्नात पोहोचल्यामुळे आसपासची मंडळी कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील याबद्दल जरा साशंक होती.आमची मालिका 'लग्न' विषयावर भाष्य करते. त्यामुळे या हटके प्रमोशनफंड्याचा नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे आधी कधीच प्रमोशन केले नसल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाही मजा आलीच शिवाय इथल्या मंडळींनीही आम्हाला भेटून आनंद व्यक्त केला.