Join us

"बार्बी नाही म्हैस दिसतेस" टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'समाज...'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2023 15:57 IST

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बॉडीशेमिंग करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर बार्बी चा ट्रेंड सुरु आहे. हॉलिवूड सिनेमा 'बार्बी' मुळे जगभरात लोक बार्बी अवतारातील फोटो पोस्ट करत आहेत. सेलिब्रिटींमध्ये तर याची प्रचंड क्रेझ आहे. नुकतंच टीव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजीने बार्बी अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.  मात्र तिला वजनावरुन नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे. यावर अभिनेत्री चांगलीच भडकली आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड फॉलो करताना वाहबीजने एक बार्बी रील बनवले. गुलाबी, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये तिने 'बार्बी'चे डायलॉग्स रिक्रिएट केले. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बॉडीशेमिंग करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. 'बार्बी नाही तर म्हैस आहे' अशीही एक विचित्र कमेंट करण्यात आली आहे. हे पाहून वाहबीज जाम भडकली आहे. 

वाहबीजने ट्रोलर्सची कानउघाडणी करत लिहिले, 'माझ्या बार्बीच्या व्हिडिओवर अशा तिखट प्रतिक्रिया वाचून फार वाईट वाटले. काही लोक म्हणत आहेत की बार्बी नाही उलट म्हैस आहे. पहिल्यांदाच पाहिली अशी बार्बी आणि असेच आणखी कमेंट्स. ही अगदीच शरमेची गोष्ट आहे की आजही मुलींना समाजाला खूश करण्यासाठी स्टँडर्ड्स राखावे लागतात. पण काळ बदलतोय आणि स्टिरिओटाइप्स फॉलो करण्याच्या विरोधात आहे.'

ती पुढे लिहिते,'जेव्हा मी उभी राहते तेव्हा ते इतर महिलांसाठीही फायदेशीरच आहे. आम्हाला जज न करता स्वत:चं कॅरेक्टर आधी तपासा आणि चांगला व्यक्ती होण्याकडे लक्ष केंद्रित करा. समाजाला आपले विचार बदलण्याची आणि टॉक्झिक ब्युटी स्टँडर्ड्समधून बाहेर पडण्याची गरज आहे.'

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाट्रोल