Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बराक ओबामा झळकणार टेड टॉक्समध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:12 IST

टेड टॉक्स हा कार्यक्रम पाश्चिमात्य देशांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषेत पाहायला मिळतो. या कार्यक्रमात ...

टेड टॉक्स हा कार्यक्रम पाश्चिमात्य देशांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषेत पाहायला मिळतो. या कार्यक्रमात अनेक देशातील नामवंत आणि प्रतिभाशाली व्यक्ती प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या कार्यक्रमात येऊन ही मंडळी आपला अनुभव, आपली मते मांडत असतात. आपल्या आयुष्यातील घटनांविषयी आपल्या फॅन्सना सांगतात. आता टेड टॉक्स हा कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाचे भारतीय व्हर्जन प्रेक्षकांना स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.भारतातीतल मनोरंजन क्षेत्रातील, तसेच विविध क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. शाहरुख खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला तो लवकरच सुरूवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण यश राज स्टुडिओमध्ये लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. शाहरुखसोबतच या कार्यक्रमात टिव्ही जगतातील क्वीन एकता कपूर देखील हजेरी लावणार आहे. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमातील एका भागात उपस्थित राहाण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना देखील निमंत्रित करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. बराक ओबामा यांना आमंत्रण देण्यात आले असले तरी ते या कार्यक्रमात उपस्थिती लावणार की नाहीत याबाबत अद्याप तरी वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण बराक ओबामा यांनी या कार्यक्रमात हजेरी लावल्यास भारतीय टेलिव्हिजनवरील कोणत्याही कार्यक्रमात पहिल्यांदाच ते झळकणार आहेत. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.