Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांची संगीतमय संध्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 06:30 IST

‘कानपूरवाले खुराणाज’ शोमध्ये आता बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना या कार्यक्रमात एकत्र आलेलं पाहणं हा एक अफलतून अनुभव असेल.

‘स्टार प्लस’वरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेत सर्वात बडे सेलिब्रिटीजनी आपली हजेरी लावून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात बप्पी लाहिरी आणि कुमार सानू हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे पार्श्वगायक-संगीतकार सहभागी होणार असून या दोघांना पाहणे ही प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक पर्वणी ठर ठरणार आहे.

निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “आता बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना या कार्यक्रमात एकत्र आलेलं पाहणं हा एक अफलतून अनुभव असेल. या भागात त्यांनी आपली अतिशय गाजलेली काही गाणी गायली आणि आपल्यालाही विनोदाची समज आहे, हे दाखवून दिलं. या दोघांनी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या जीवनातील काही अविस्मरणीय अनुभव सांगितले.

कार्यक्रमाचा सूत्रधार सुनील ग्रोव्हर तसेच अली असगर, सुगंधा मिश्रा आणि उपासना सिंह यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर ते काही धमालमस्ती करणा-या प्रसंगांमध्येही सहभागी झाले. ब-याच काळानंतर संगीत क्षेत्रातील या दोन गुणी दिग्गजांना एकत्र आलेलं पाहणं हा एक आगळाच अनुभव असेल.”

प्रेक्षकांना नर्म विनोदी प्रसंग आणि संवादांनी गुदगुल्या करीत हसवत ठेवणार्‍्या ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेने विनोदी मनोरंजनाचा दर्जा उंचाविला आहे. आता बप्पी लाहिरी आणि कुमार सानू यांच्यासारख्या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांना या कार्यक्रमात पाहणे हा प्रेक्षकांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार हे मात्र नक्की. 

टॅग्स :कानपुरवाले खुराणाज्बप्पी लाहिरीकुमार सानू