Join us

बंदगी कालराला मिळाली चित्रपटाची आॅफर; ‘ही’ भूमिका साकारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 17:17 IST

बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय स्पर्धक असलेल्या बंदगी कालराला एका चित्रपटाची आॅफर मिळाल्याची माहिती समोर येत आहे. वाचा सविस्तर!

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जो कोणी पाऊल ठेवतो, त्याला रातोरात लोकप्रियता मिळते. त्याचबरोबर त्याच्या करिअरलाही दिशा मिळते. एकूणच बिग बॉसचे घर म्हणजेच नशीब चमकण्याचा दरवाजाच असतो. त्यामुळेच आतापर्यंत अनेक स्पर्धकांना बिग बॉसने प्रसिद्धीझोतात आणले आहे. आता एक्स स्पर्धक बंदगी कालरा हिचेदेखील बिग बॉसने नशीब चमकविले असून, लवकरच ती एका चित्रपटात बघावयास मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक असलेल्या बंदगीला चित्रपटाची आॅफर मिळाली आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार, बंदगीला एका चित्रपटाची आॅफर मिळाली आहे.

दरम्यान, बंदगीने याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. बंदगीने म्हटले की, ‘आताच मी याविषयी जास्त काही सांगू शकत नाही. परंतु असे झाल्यास मी नक्कीच ही बातमी सर्वांबरोबर शेअर करणार. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात बंदगी एका रेडिओ जॉकीची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटावर अद्यापपर्यंत काम सुरू झाले नाही. परंतु लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. खरं तर बंदगी पहिलीच चित्रपटात काम करणारी बिग बॉसची स्पर्धक नसून, यापूर्वीही बरेचशा स्पर्धकांना अशाप्रकारची संधी मिळाली आहे.

Instagram link: https://www.instagram.com/p/BcckpXcgBx_/

याअगोदर मनवीर गुर्जर, मनू पंजाबी आणि नितिभा कौर हे कॉमनर बिग बॉसमुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आले. बिग बॉस सीजन ११ मध्ये सध्या लव त्यागी, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, हिना खान, पुनीश शर्मा आणि आकाश ददलानी हे सहा सदस्य आहेत. यातील चार सदस्य या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले असून, लव त्यागी घराबाहेर पडला असल्याची माहिती समोर येत आहे.