Avika Gor On Her Pregnency: 'बालिका वधू' या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकेतून अविका गौर हे नाव घराघरात पोहोचलं. अविका गौरने तीन महिन्यांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानीसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाची फार चर्चा झाली होती. कारण, 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर त्यांनी सातफेरे घेतले होते. अलिकडेच अविकाने सोशल तिचा एक व्लॉग शेअर केला होता. ज्यांमध्ये त्यांनी २०२६ मध्ये आमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, असं सांगितलं. तिच्या या वक्तव्यानंतर अविका गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. आता या चर्चांवर प्रतिक्रिया देत अविकाने मौन सोडलं आहे.
अविका गौर आणि मिलिंद चांदवानी यांनी महिन्यांपूर्वीच तिने लग्न केलं. त्यात लग्नाच्या तीन महिन्यानंतर ती गुडन्यूज देणार असल्याची अशी चर्चा होऊ लागली. आता स्वत अविकाने प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासंदर्भात 'टेली टॉक इंडिया' सोबत बोलताना अविका म्हणाली,"मी गरोदर आहे या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. मुळात असं काहीच नाही. खरी बातमी वेगळीच आहे आणि आम्ही लवकरच त्याबद्दल सांगणार आहोत."
अविकाने पती मिलिंदसोबत नवीन व्लॉग शेअर केला होता. ज्यामध्ये ती म्हणते, २०२६ मध्ये आमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. यासाठी आम्ही दोघेही खूप उत्सुक आहोत. याबद्दल आम्ही कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. याची कल्पनाही केली नव्हती. पण आमच्या आयुष्यातील हा बदल खूपच छान असणार आहे, असं अविका व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. त्यांनंतर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या.
रिॲलिटी शोमध्ये केलेलं लग्न...
अविका आणि मिलिंदची प्रेमकहाणी बरीच चर्चेत राहिली आहे. या जोडप्याने जून २०२५ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि नंतर 'पती, पत्नी और पंगा' या शोच्या सेटवर लग्न केलं. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार ते अविका-मिलिंद विवाह बंधनात अडकले.
Web Summary : Avika Gor denies pregnancy rumors following speculation after hinting at a major life change in 2026 with husband Milind Chandwani. The actress clarified that while a big announcement is coming, it's not what people expect.
Web Summary : अविका गौर ने पति मिलिंद चांदवानी के साथ 2026 में बड़े बदलाव का संकेत देने के बाद प्रेग्नेंसी की अफवाहों का खंडन किया। अभिनेत्री ने स्पष्ट किया कि एक बड़ी घोषणा आने वाली है, लेकिन यह वह नहीं है जो लोग उम्मीद कर रहे हैं।