Join us

"लवकरच आमचं छोटंसं..." लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने दिली 'गुड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:18 IST

लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर नुकतीच लग्नबंधनात अडकली. 'बालिका वधू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अविका गौरने तिचा प्रियकर मिलिंद चंदवानीसह लग्नगाठ बांधली.  अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. लग्नाच्या अवघ्या चार दिवसांनंतर या जोडप्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. 

अविका गोरनं इन्स्टाग्रामवर लग्नापुर्वी शूट केलेला एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात अविका म्हणते, "आज आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे."लग्नापूर्वी असे घडेल याची कल्पना केली नव्हती. यावर मिलिंद म्हणतो, "अविका, एकदा नीट विचार कर. मला तर कुटुंबाला सांगायला खूप भीती वाटते. ते काय म्हणतील, इतक्या लहान वयात हे सर्व केलं". तर अविका पुढे म्हणते, "चार लोक चर्चा करतील. जगासमोर आणण्यापूर्वी त्यांच्या टोमणए ऐकावे लागतील". पुढे मिलिंद तिला विचरतो, "हे लग्नानंतर सांगायचं का". त्यावर अविका उत्तर देते, "तितक्यावेळी खूप उशीर होईल. लोकांना आधीच दिसायला लागेल". यानंतर या जोडीनं खुलासा करत सांगितलं की त्यांनी नवं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. अविका म्हणाली, "खूप लवकर आमचं छोटूसं, गोंडस यूट्यूब चैनल येत आहे".

 यूट्यूब चॅनलची घोषणा!

अविका आणि मिलिंदने इतका सस्पेन्स फक्त त्यांचा यूट्यूब चैनल प्रमोट करण्यासाठी तयार केला होता. कपलने त्यांच्या यूट्यूब चैनलचं नाव  ‘Avika & Milind असं ठेवलं आहे. दरम्यान , अविका आणि मिलिंद यांचा काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. आता अविका आणि मिलिंद लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अविकाचा नवरा मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली. एमटीव्ही रोडीज शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता. मिलिंद आणि अविकाची भेट त्याच्या एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Avika Gor announces 'Good News' four days after wedding.

Web Summary : Avika Gor, famed for 'Balika Vadhu,' married Milind Chandwani. Shortly after, the couple announced the launch of their new YouTube channel, 'Avika & Milind,' creating anticipation among their fans. They met at an NGO event and fell in love.
टॅग्स :अविका गौरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार