Join us
Daily Top 2Weekly Top 5

​स्टार प्रवाहच्या गोठमध्ये बयो आजी आणि बेबी आत्या आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 15:46 IST

गोठ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही महिने झाली असून ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा ...

गोठ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही महिने झाली असून ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे.कुठल्याही मालिकेत सहसा एका पेक्षा जास्त खलनायकी व्यक्तिरेखा नसते. सतत काही ना काही कुरघोड्या करून ही खलनायकी व्यक्तिरेखा नायक, नायिका किंवा त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न करते. स्टार प्रवाहची 'गोठ' ही मालिका मात्र या एकच खलनायकी व्यक्तिरेखेच्या कल्पनेला अपवाद ठरली आहे. गोठमध्ये बयो आजी आणि बेबी आत्या या दोन खलनायकी व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे म्हापसेकर वाड्यात सध्या एका म्यानमध्ये दोन तलवारी असल्याचे वातावरण दिसून येत आहे.'गोठ' मालिकेतील म्हापसेकरांच्या घरात बयो आजीचा वचक आहे. घरातलं कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाही. राधाला त्रास देण्यासाठी बयो आजी सतत प्रयत्नशील असते. त्यात पुन्हा बयो आजीची नणंद बेबी आत्या म्हापसेकरांच्या घरात आली आहे. तिचाही घरात दरारा आहे. बेबी आत्याचं वागणं वर्चस्व राखणारं आहे. मात्र तिचे नेमके हेतू काय आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्मृती हरवलेला विलास, राधा आणि बाकीचे सगळेच निमूटपणे बेबी आत्याचं सगळं ऐकत आहेत. बेबी आत्याच्या या वागण्यावर बयो आजीने अजून काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, तिच्या मनात काहीतरी शिजत आहे.बेबी आत्या आता पुढे जाऊन काय काय पराक्रम करणार, त्याला बयो आजी काही उत्तर देणार की थेट धोबीपछाड डाव टाकणार, राधा-विलासच्या नात्याचे काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळणार आहेत. दोन खलनायकी व्यक्तिरेखांनी 'गोठ' या मालिकेला अजून रंजक केलं आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. सोशल मीडियाच्या द्वारे गोठ या मालिकेचे फॅन्स त्यांना बयो आजी आणि बेबी आत्या या व्यक्तिरेखा प्रचंड आवडत असल्याचे सांगत आहेत. Also Read : ​'गोठ'च्या बयोआजी म्हणजेच नीलकांती पाटेकर बनल्या सिक्रेट सॅन्टा!