Join us

बाघा-बावरीचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:58 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बाघा-बावरी या जोडप्याचा आता साखरपुडा होणार आहे. या साखरपुड्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बाघा-बावरी या जोडप्याचा आता साखरपुडा होणार आहे. या साखरपुड्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाघा खूप श्रीमंत असून त्याचे मोठे दुकान आहे आणि जेठालाल त्याचा नोकर आहे असे बावरीच्या घरातल्यांना बावरीने सांगितलेले आहे. त्यामुळे साखरपुड्याच्या काळामध्ये जेठालाल नोकर म्हणून वावरताना आपल्याला दिसणार आहे तर दया ही बाघाची बहीण बनणार आहे. बाघा गोकुलधाम सोसायटीत राहातो असे बावरीच्या घरातले समजत आहेत. यामुळे बाघा-बावरीचा साखरपुडा गोकुळधाम सोसायटीतच होणार आहे. या निमित्ताने गोकुळधामवासियांना एक सेलिब्रेशनची संधी मिळणार आहे.