Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का...'च्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी, दयाबेननंतर आता 'हा' कलाकारदेखील मालिकेला करणार रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 17:00 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. या मालिकेतील आणखीन एक कलाकार मालिकेला अलविदा करणार आहे.

ठळक मुद्देमयुर वकानी लवकरच मालिकेचा घेणार निरोप

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. या मालिकेतील आणखीन एक कलाकार मालिकेला अलविदा करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेठालालचा मेहुणा आणि दया भाभीच्या भावाची भूमिका साकारणारा सुंदर वीरा म्हणजेच अभिनेता मयुर वकानी लवकरच मालिकेचा निरोप घेणार आहे.

मयुर वकानी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दया भाभी म्हणजेच दिशा वकानीच्या भावाची भूमिका करतो आहे आणि खऱ्या आयुष्यात देखील तो तिचा भाऊ आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदींच्या बहिण दिशासोबत वाईट वर्तवणुकीमुळे तो वैतागला आहे आणि त्याने ही मालिका सोडायचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार निर्मात्यांनी दिशाला तीस दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी सांगितले की, दिशाने तीस दिवसात ठरवावे की तिला या मालिकेत काम करायचे आहे की नाही. जर ती येणार असेल तर आम्ही तिचे आनंदाने स्वागत करू, मात्र जर ती नाही परतली तर तिच्या जागी दुसऱ्या कलाकाराला घेतले जाईल.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार असित मोदींनी सांगितले की, आताही आम्ही दिशाच्या परतण्याची वाट पाहत आहोत. मला वाटते की कोणताही कलाकार मालिकेपेक्षा मोठा नसतो आणि त्याला यशस्वी बनवण्यासाठी कलाकाराला प्रोफेशनल पद्धतीने काम केले पाहिजे. मालिकेतील कथेनुसार, दया तिच्या गावी अहमदाबादला गेली आहे आणि तिथून ती अद्याप गोकुळधाम सोसायटीत परतली नाही.

दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून मालिकेत दिसत नाही. ती मॅटर्निटी लिववर गेली होती. त्यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. ती मालिका सोडून गेल्यापासून दीड वर्ष झाली आहेत आणि अद्याप ती परतली नाही. सूत्रांकडून समजते आहे की ती मालिकेत आता परतणार नाही.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी