Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे अविका गौरला कोसळले होते रडू, एका गोष्टीमुळे झाला तिचा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 11:15 IST

'बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वी अविका गौरने  तिच्या वाढत्या वजनाबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. अविकाचीही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. आता अविकाने इन्स्टाग्रामवर तिचे आणखी काही नविन फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत तिचा पूर्ण कायापालट झाल्याचे पाहायला मिळते आहे. जुने फोटो आणि आत्ताचे फोटो पाहून तिच्यात कमालीचा बदल झाल्याचे तुमच्याही लक्षात येईल.

मुळात पुन्हा फिट आणि फाइन होण्यासाठी तिनेही तितकीच मेहनत घेतली आहे. नित्यनियमाने योग्य वर्कआऊट आणि डाएट तिने घेतले.  नवीन शेअर केलेल्या फोटोत तिने एक महत्त्वपूर्ण संदेशही दिला आहे. शेअर केलेल्या फोटोत तिने ब्लॅक एंड व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे. वेस्टर्न आउटफिटमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही अधिक पसंतीस पात्र ठरत आहेत. इतकेच नाहीतर सोनिका भदौरिया, अली गोनी, टीना दत्ता, सुयश रॉयसह अनेक टीव्ही जगतातल्या कलाकारांनी कमेंट करत पसंती देत आहेत. 

फिजिकल ट्रांसफॉर्मेशनवर शेअर केली होती भावनिक पोस्ट

अलीकडेच अविकाने इंस्टाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले होते. ज्यात तिने तिच्या वाढत्या वजनाबाबत चिंता व्यक्त केली होती.  अविकाने लिहिले - मला अजूनही आठवते, गेल्या वर्षी एका रात्री, मी जेव्हाला स्वतःला  आरशात पाहिले तेव्हा, माझे मलाच रडू आले. मी स्वतःला अशा रूपात पाहिले मला अजिबात आवडले नाही.  अतिशय जाडजुड अशी मी दिसत होती. माझे हात पाय बघून तर मला धक्काच बसला इतके सुजल्यासारखे दिसत होते. शरिराची अशी अवस्था ब-याचदा थायरॉईड किंवा पीसीओडी आजारामुळे होते. यापैकी कोणताही आजार मला नाही. तरीही माझे सतत वजन वाढत होते.  मी तेव्हाच ठरवले उगाच जे वाटेल ते खायचे नाही. कमी कॅलरीज आणि योग्य आहार घेणे गरजेचे असून नियमित वर्कआऊट करण्यावर भर दिला आणि आज मी पुन्हा पूर्वीप्रमाणे स्लिम दिसत आहे. आपल्या शरिराची काळजी घेणे आपल्या हातात आहे. त्यामुळे शरिराचीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले आहे. 

'बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली.

 

मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.