मोठा ब्रेक मिळण्याआधी झळकल्या बी-ग्रेड सिनेमात,जाणून घ्या कोण आहेत अशा टीव्ही अभिनेत्री ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 11:18 IST
झगमगत्या दुनियेत नाव कमावणं ही काही सोपी गोष्ट नाही असं म्हणतात. मनोरंजनाच्या दुनियेत नाव कमावण्यासाठी सिनेमा हे एकमेव माध्यम ...
मोठा ब्रेक मिळण्याआधी झळकल्या बी-ग्रेड सिनेमात,जाणून घ्या कोण आहेत अशा टीव्ही अभिनेत्री ?
झगमगत्या दुनियेत नाव कमावणं ही काही सोपी गोष्ट नाही असं म्हणतात. मनोरंजनाच्या दुनियेत नाव कमावण्यासाठी सिनेमा हे एकमेव माध्यम नाही. सध्या तर छोट्या पडद्यावर काम करुन कुणीही रातोरात सुपरस्टार बनू शकतं. छोट्या पडद्यावर असे काही स्टार आहेत की जे रुपेरी पडद्यावरील कलाकारांपेक्षा लोकप्रिय आहेत. मात्र टीव्ही जगतात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या कलाकारांना बरीच मेहनत करावी लागली आहे. यापैकी तुमच्या लाडक्या अभिनेत्रींना तर बी-ग्रेडच्या सिनेमातही काम करावं लागलं आहे. कोण आहेत या अभिनेत्री.सना खान सना खान हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे.विविध मालिकांमध्ये झळकलेल्या सनाची फॅन फॉलोईंग बरीच आहे. मात्र छोट्या पडद्यावर काम करण्याआधी सनाने 'क्यायमेक्स' नावाच्या बी-ग्रेड सिनेमात काम केलं आहे. अर्चना पूरनसिंह विविध सिनेमांमध्ये सहअभिनेत्री म्हणून भूमिका साकारणा-या अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरनसिंह. सिनेमांसोबतच विविध कॉमेडी शोमध्ये अर्चना खळखळून हसताना आणि हसवताना पाहायला मिळतात. मात्र अर्चना पूरनसिंह यांनाही सुरुवातीच्या काळात बी-ग्रेड सिनेमात काम करावं लागलं होतं. रश्मी देसाई उतरन मालिकेमुळे रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. मात्र छोट्या पडद्यावर झळकण्याआधी रश्मीनं बी-ग्रेड सिनेमात काम केलं आहे. श्वेता तिवारी कसोटी जिंदगी की या मालिकेमधून अभिनेत्री श्वेता तिवारीनं रसिकांची मनं जिंकली. मात्र श्वेतानं याआधी विविध बीग्रेड सिनेमात हॉट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. दिशा वकानी घराघरातील सा-याची आवडती अभिनेत्री म्हणजे दयाबेन.'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील आपला अभिनय आणि गरब्यामुळे दयाबेन रसिकांची फेव्हरेट बनली आहे. मात्र दयाबेनची भूमिका साकारणा-या अभिनेत्री दिशा वकानी हिलासुद्धा करियरच्या सुरुवातीला बी-ग्रेड सिनेमात काम करावं लागलं आहे.