Join us

ठरलं तर! या दिवसापासून सुरु होणार अवधूत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते'; प्रोमो आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 16:46 IST

या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून 'खुप्ते तिथे गुप्ते' चर्चेत आहे.

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. यात आता अवधूत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. 

'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) म्हणत आहे,"ही खूर्ची देशाचं भविष्य घडवते, ही निर्दोषांना न्याय मिळवून देते, ही माणसाचा जीव वाचवते आणि ही खूर्ची प्रश्न विचारते, हिच्या प्रश्नांनाही धार आहे. खूर्चीवर बसायला कोण कोण तयार आहे? आता खूपणार नाही तर टोचणार". 4 जूनपासून दर रविवारी रात्री 9 वाजता, असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 

10 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'खुप्ते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुपिते उलगडली जाणार आहेत. सेलिब्रिटींपासून राजकारणी मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार  'खुप्ते तिथे गुप्ते' सुरु होत असल्याने 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. 

 

टॅग्स :अवधुत गुप्ते झी मराठी