Join us

Avneeet Kaur: सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौरनं फक्त ब्रा घालून केला बोल्ड डान्स, फ्लॉन्ट केला प्रायव्हेट टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:32 IST

Avneet Kaur : अवनीत कौरच्या बोल्ड डान्सवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, पण त्याचवेळी तिच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कमी वयातच अनेक सौंदर्यवतींनी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. अशाच एका २१ वर्षीय अभिनेत्री, जी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे, तिने इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने केवळ ब्रा घालून डान्स केला नाही तर तिचा खाजगी टॅटू देखील दाखवला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अवनीत कौर (Avneet Kaur) आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अवनीत कौरने 'कमांडो' या इंग्रजी गाण्यावर डान्स रील रेकॉर्ड करून पोस्ट केला आहे. या रीलमध्ये अवनीतने फक्त स्ट्रॅपलेस ब्रासोबत पांढरी कॅप आणि हिरवी कार्गो पॅंट परिधान केली आहे. या व्हिडीओतील तिचा डान्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

या व्हिडिओमध्ये अवनीतच्या बोल्ड डान्सवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, पण त्याचवेळी चाहत्यांना अवनीतच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जेव्हा अवनीत फक्त ब्रा घालून नाचली तेव्हा लोकांच्या लक्षात आले की एक टॅटू आहे, जो सहसा कपड्यांनी झाकलेला असतो. अवनीतच्या या खासगी टॅटूवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे.