अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि आदर्श कपल आहेत. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत त्यांनी काम केलं आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरही हे जोडपं लोकप्रिय आहे. अविनाश आणि ऐश्वर्या नारकर रील्समधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या रील्सही व्हायरलही होतात. सध्या अविनाश यांच्या अशाच एका रीलची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवरुन अविनाश यांचं एक रील शेअर केलं आहे. या रीलमध्ये अविनाश नारकर घरात झाडू मारताना दिसत आहेत. त्यानंतर घरातील फरशीही ते पुसतात. एवढंच नव्हे तर बाजारातून त्यांनी भाजी आणल्याचंही या व्हिडीओत पुढे पाहायला मिळत आहे. "काय करावं बरं", असं मजेशीर कॅप्शन देत ऐश्वर्या यांनी ही रील शेअर केलं आहे. इतके मोठे स्टार असूनही अविनाश यांना घरातील काम करताना बघून चाहते थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
"बघणाऱ्या बाकीच्या नवऱ्यांनी यातून बोध घ्यावा", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एका युजरने म्हटलं आहे की "वेगळे काही करू नका, जे करताय ते करत राहा". "आपल्या स्वतःच्या घरात खरं तर कोणीही काम केलं पाहिजे. आपल्या घरात काम करायची कसली लाज आणि आपल्या अर्धांगिनी ला मदत केलेली अती उत्तम", असंही एकाने म्हटलं आहे. "अवी सर आदर्श आहेत", "सगळ्यांसाठी यातून प्रेरणा मिळते", अशाही काही कमेंट आहेत.
Web Summary : Actor Avinash Narkar wins hearts by sharing a reel of himself doing household chores. Wife Aishwarya shared the video, praising Avinash's down-to-earth nature. Fans applaud his gesture, encouraging others to follow suit, emphasizing shared responsibility.
Web Summary : अभिनेता अविनाश नारकर ने घर के काम करते हुए एक रील साझा करके दिल जीत लिया। पत्नी ऐश्वर्या ने अविनाश की प्रशंसा करते हुए वीडियो साझा किया। फैंस उनके हावभाव की सराहना करते हैं, और अन्य लोगों को भी ऐसा करने के लिए प्रोत्साहित करते हैं, साझा जिम्मेदारी पर जोर देते हैं।