Join us

​अविका गौर म्हणतेय मनीष रायसिंघानी माझ्या वडिलांच्या वयाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 10:26 IST

ससुराल सिमर का या मालिकेत अविका गौर आणि मनीष रायसिंघानी यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. या जोडीची या ...

ससुराल सिमर का या मालिकेत अविका गौर आणि मनीष रायसिंघानी यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. या जोडीची या मालिकेच्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अविका आणि मनीष हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात होते. गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात या बातम्या येत असल्या तरी मनीष आणि अविकाने याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता दोघांनीही आमच्यात काहीही नाते नसून या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. अविकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, मनीष माझ्या वडिलांपेक्षा केवळ काहीच वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्याच्यासोबत माझे अफेअर असण्याचा प्रश्नच नाही. आमची मैत्री ही अतिशय खास असून ती शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. आमची मैत्री ही आम्ही एकमेकांना देत असलेला मानसन्मान, अंडरस्टँडिग यांच्यावर बेतलेली आहे. आम्ही दोघे बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर असून मी त्याला शिन चँग अशी हाक मारते तर तो मला मिजी म्हणजेच शिन चँगची मम्मी अशी हाक मारतो. आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स असून कायचम चांगले फ्रेंड्स राहाणार आहोत. मनीषला डेट करण्याचा माझा साधा विचारदेखील नाही. तर या सगळ्यावर मनीषने म्हटले आहे की, सुरुवातीला या बातम्या ऐकून मला खूप त्रास झाला होता. त्यामुळे अविकापासून मी दूर राहाण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझ्या मनात काहीही नसताना मी असे का वागू असा मी विचार केला आणि तिच्यासोबत मैत्री तशीच ठेवली. अविका माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे. आमची बाँडिंग खूप चांगली असली तरी आम्ही कधीच अफेअरचा विचार केला नाही.