Join us

​कृष्णा चली लंडन या मालिकेतील राधे या भूमिकेसाठी घेतले गेले शंभरहून अधिक कलाकारांचे ऑडिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 16:45 IST

‘स्टार प्लस’ वाहिनी लवकरच ‘कृष्णा चली लंडन’ ही एक नवी मालिका प्रसारण करणार असून त्यात राधे या मुलाची प्रेमकथा ...

‘स्टार प्लस’ वाहिनी लवकरच ‘कृष्णा चली लंडन’ ही एक नवी मालिका प्रसारण करणार असून त्यात राधे या मुलाची प्रेमकथा सादर करण्यात आली आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असतो. गौरव सरीन याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. राधेचे एकच स्वप्न आहे ते म्हणजे लग्न करणे! तो स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे.राधेच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य त्या कलाकाराची निवड करण्यासाठी शंभराहून अधिक इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्यात आली होती आणि त्यातून गौरव सरीनची निवड करण्यात आली. या व्यक्तिरेखेसाठी चेहऱ्यावर अगदी निरागस भाव असलेल्या कलाकाराची गरज होती. निर्मात्यांच्या मते या भूमिकेसाठी असलेले सगळे गुण गौरवमध्ये होते. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली. आता स्टार प्लसवरील या मालिकेद्वारे गौरव टीव्ही मालिकांमधील आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला प्रारंभ करणार आहे. या भूमिकेसाठी निवड झाल्याचा आनंद व्यक्त करताना गौरव सांगतो, या भूमिकेसाठी माझी निवड झाल्याची बातमी देणारा फोन निर्मात्यांकडून आल्यावर मी हवेतच तरंगत होतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आता या भूमिकेत मी सर्वस्व ओतण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेची तयारी करण्यासाठी मी विविध कार्यशाळांमध्ये भाग घेतला आणि भूमिकेचा सराव केला. या मालिकेचा मला भाग होता आले, याचा मला फार आनंद झाला आहे. मी या भूमिकेला न्याय देईन असा मला विश्वास आहे.”कृष्णा चली लंडन या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये राधे आपली स्वत:ची माहिती देत असून त्याचा मित्र साजन ती मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राधेची ओळख जाणून घेण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारले जात आहेत. यात त्याचे ‘नाव’, ‘काम’, ‘आपल्या पायावर उभा आहे की नाही?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्याला देताना दिसत आहे. या प्रोमोच्या अखेरीस राधे आपली ही ओळख करून देणारा व्हिडिओ अनेक मुलींना पाठवतो आणि त्यासोबत एक प्रश्नही विचारतो, “है कोई नजर में?” कृष्णा चली लंडन या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले असले तरी या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.Also Read : ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची अशी असणार आहे कथा