Join us

डान्स प्लसच्या सेटवर घेतली गेली ऑडिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 12:30 IST

डान्स प्लस या कार्यक्रमात नुकतीच ढिश्शूम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ...

डान्स प्लस या कार्यक्रमात नुकतीच ढिश्शूम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे वरूणने डान्स प्लसचा सुपर जज रेमो डिसोझाने दिग्दर्शित केलेल्या एबीसीडी 2 या चित्रपटात काम केले होते. तर जॅकलिन फ्लाईंग जट या चित्रपटात रेमोसोबत काम करत आहे. यामुळे डान्स प्लसच्या या भागाचे चित्रीकरण म्हणजे एखादे गेटटुगेदर असल्यासारखेच रेमोला वाटत होते. रेमो एबीसीडी 3 या चित्रपटाचे लवकरच दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी यासाठी वरुणने चक्क डान्स प्लसच्या सेटवरच ऑडिशन दिले. या त्याच्या ऑडिशनमुळे स्पर्धकांसोबतच मेन्टरही खळखळून हसले.