Join us

एक दुजे के वास्ते घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 17:09 IST

एक दुजे के वास्ते या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या ...

एक दुजे के वास्ते या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी निकिता दत्ता गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहे. तिला रुग्णालयातून घरी आणण्यात आले असले तरी अशक्तपणामुळे ती चित्रीकरण करू शकत नाहीये तर दुसरीकडे नमिक पॉललाही गेल्या काही दिवसांपासून सतत ताप भरत आहे. तसेच मालिकेच्या टीममधील अनेकजणही तापाने कंटाळलेले आहेत. निकिता आणि नमिक चित्रीकरणाला उपलब्ध नसल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. या सगळ्या कारणांमुळे ही मालिका संपवण्याचा निर्णय वाहिनी आणि निर्मात्यांनी घेतला आहे. ही मालिका 7 ऑक्टोबरला एका गोड वळणावर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.