Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेमास रंग यावे'मधून अमिता कुलकर्णीच्या एक्झिटमुळे प्रेक्षक नाराज, त्यावर अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:53 IST

Amita Kulkarni : 'प्रेमास रंग यावे' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेत अक्षरा आणि सुंदर या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. मालिका छान सुरळीत असतानाच अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमिता कुलकर्णी हिने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

सन मराठी वाहिनीवरील प्रेमास रंग यावे (Premas Rang Yave) या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेत अक्षरा आणि सुंदर या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. मालिका छान सुरळीत असतानाच अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमिता कुलकर्णी (Amita Kulkarni) हिने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. अमिताच्या जागी अमृता फडके ही भूमिका साकारत आहे, पण प्रेक्षकांनी अमिताला मालिकेत परत आणा अशी मागणी केली जात आहे. प्रेक्षकांच्या या मागणीवर खुद्द अमिताने एक खुलासा केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत अमिता मालिकेतून का बाहेर पडली याचे कारण तिने सांगितले आहे. तिने वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडल्याचे या व्हिडीओत सांगितले.

अमिता कुलकर्णी या व्हिडीओत म्हणाली की, मला मालिकेतून काढून टाकले या सगळ्या अफवा आहेत. मला यासंदर्भात अनेकांचे मेसेजेस येत आहेत. त्यांना मी एवढेच सांगते की माझे वडील गेले काही दिवसांपासून खूप आजारी आहेत. यावेळी त्यांना माझी खूप गरज होती त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. कधीकधी तुम्ही तुमच्या कामापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणे गरजेचे असते. आई, वडील, मुलं, नवरा या आपल्या माणसांसाठी तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात.

ती पुढे म्हणाली की, मी माझ्या वडिलांची काळजी घेण्यासाठी मालिकेतून काढता पाय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर मला दिग्दर्शक, निर्माते सर्वांनी खूप सहकार्य केले. माझ्यावर विश्वास दाखवत मालिकेत अक्षराला घडविण्यासाठी खूप जणांनी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. प्रेक्षकांनीही या मालिकेवर खूप प्रेम दाखवले, असेच प्रेम तुम्ही पुढेही दाखवाल अशी आशा आहे.